मुंबई विद्यापीठाने बी.कॉम.च्या परीक्षेची पद्धत
आणि सर्वच शाखांच्या अभ्यासक्रमात बदल करण्याचा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. आंतरराष्ट्रीय
स्तरावर असणारी क्रेडिट सिस्टिमही पुढील वर्षापासून बी.ए., बी.कॉम. आणि बी.एससी.च्या द्वितीय वर्षाच्या
विद्यार्थ्यांसाठी लागू करण्यात येणार आहे. पहिल्या आणि दुसऱ्या सेमिस्टरमध्ये दोन-दोन
विषयांत एटीकेटी असणाऱ्या विद्यार्थ्यांना तिसऱ्या सेमिस्टरला बसता येईल, असा बदलही करण्यात हे. आला आ
परीक्षा १०० नाही, तर ६० गुणांची असणार आहे आणि ४० गुण कॉलेजने द्यावयाचे आहेत. थोडक्यात, परीक्षापद्धतीचे विद्यापीठाने आता सुलभीकरण केले आहे. उच्च शिक्षणासाठी परदेशी जाणाऱ्या विद्यार्थ्यांची वाढती संख्या लक्षात घेता क्रेडिट सिस्टिमचा त्यांना फायदा होऊ शकेल. मात्र हे सर्व बदल लक्षात घेतले तर परीक्षा ही फारच सोप्पी करण्याचाच हा प्रयत्न असल्याचे स्पष्ट होते. तसे ते करावे काय हा कळीचा मुद्दा आहे. बदलत्या काळाचा रेटा आणि जागतिकीकरण, उदारीकरण आणि खाजगीकरण यामुळे होत असलेले सर्वच क्षेत्रांतील परिवर्तन लक्षात घेतले तर व्यवसायाभिमुख शिक्षण असणे ही आता काळाची गरज आहे. तसा जाणीवपूर्वक प्रयत्न करायला लागणार आहे.
पुढच्या वर्षामध्ये सर्वच शाखांच्या पहिल्या वर्षाच्या अभ्यासक्रमात बदल करताना याचा विचार केला जाईल, अशी अपेक्षा आहे. मात्र ते करतानाही शिक्षण अधिक कसदार करण्याची नितांत गरज आहे. विज्ञान, तंत्रज्ञानातील प्रगती आता प्रयोगशाळांमध्ये बंदिस्त होऊन राहणारी नाही; तर तिने आता माणसाच्या घरात प्रवेश केला आहे. अशा स्थितीत विविध ज्ञानशाखांची अभेद्य कुंपणे करून चालणार नाही; तर त्यामध्ये विद्यार्थ्यांना आपल्या आवडीचे विषय घेण्याची मुभा ठेवावी लागणार आहे. पाश्चात्त्य जगात बहुसंख्य विद्यापीठांमध्ये अशा प्रकारची मोकळीक विद्यार्थ्यांना मिळते.
त्याचा त्यांना व्यक्तिगत आयुष्यात फायदा होतोच; परंतु अंतिमत: समाजाच्या आणि देशाच्याही ते हिताचेच ठरते. मात्र असा बदल करण्यासाठी शिक्षणाचा पोथीनिष्ठ विचार सोडून द्यावा लागेल. वर्तमानाची गरज आणि भविष्याच्या अपेक्षा यांचा विचार करून विद्यापीठांच्या विविध शाखांचे अभ्यासक्रम ठरवावे लागतील. दुदैर्वाने आपल्याकडे सध्या अभ्यासापेक्षा परीक्षेला आणि त्यातील यशालाच अधिक महत्त्व आले आहे. परीक्षा ही महत्त्वाची असतेच; कारण विद्यार्थ्याला संबंधित विषय किती आणि कसा समजला आहे, याचे मूल्यमापन त्यातून होत असते. परंतु खरे महत्त्व हे शिकण्याला असायला हवे; परीक्षेतील गुणांना नाही. मात्र सध्या सारे महत्त्व हे परीक्षेतील यशाला दिले जात असल्याने अध्ययन करणारे विद्याथीर् नाहीत, तर परीक्षार्थी झाले आहेत.
मुंबई विद्यापीठाने केलेले बदल या परीक्षार्थींच्या पथ्यावर पडणारे आहेत. त्यामुळे या बदलांचा परिणाम एकंदरच शिक्षणपद्धती अधिक अशक्त होण्यात होईल की काय अशी भीती वाटते. वास्तविक शिक्षणाने संबंधिताच्या आकलनक्षमता वाढवल्या पाहिजेत. त्याच्या ज्ञानाच्या कक्षा विस्तारल्या पाहिजेत. त्याच्या माहितीच्या वर्तुळाचा परीघ मोठा झाला पाहिजे. त्याच्यामध्ये ज्ञानलालसा निर्माण व्हायला पाहिजे. त्याच्या मनावरही सुसंस्कार झाले पाहिजेत. थोडक्यात, शिक्षणाने संबंधिताच्या व्यक्तिमत्त्वामध्ये आमूलाग्र परिवर्तन घडवायला हवे. असे परिवर्तन घडविण्याची शक्ती असलेले शिक्षण राबवायचे की परीक्षेची रीतच सोप्पी करून उत्तीर्ण विद्यार्थ्यांची संख्या वाढविण्यातच धन्यता मानायची याचा विचार करण्याची वेळ आता आली आहे.
यंदा बी.कॉम.च्या तृतीय वर्षाच्या परीक्षेला ९० हजार ते एक लाख विद्याथीर् बसणार आहेत. नव्या परीक्षापद्धतीमुळे यंदा पदवीधारकांची संख्या एकदम वाढणार आहे. यातील सर्वच विद्याथीर् पदव्युत्तर शिक्षण घेत नाहीत. बहुसंख्य विद्यार्थ्यांना, विशेषत: नवसाक्षर कुटुंबांतील आणि आथिर्कदृष्ट्या कमकुवत गटातील विद्यार्थ्यांना पदवी मिळविल्याबरोबर अर्थार्जन करणे भाग पडते. अशांच्या संख्येतही आता एकदम भर पडणार आहे. या नवपदवीधारकांना सामावून घेण्याइतक्या रोजगाराच्या संधी उपलब्ध होणे अवघड आहे. पदवी मिळविली, पुढे काय हा प्रश्ान् त्यांना अस्वस्थ करणारा आहे. त्यातून येणारे नैराश्य आणि विफलतेची भावना तरुणांच्या मनाचे खच्चीकरणच करते. ते आपल्या समाजाच्या आणि देशाच्या हिताचे नाही.
चालू शतकामध्ये आपण महासत्ता होण्याची भाषा करत आहोत. परंतु या स्वप्नपूतीर्साठी आवश्यक असणारे सक्षम तरुण आपण तयार करत आहोत काय याचा विचार शिक्षणक्षेत्रातील धुरिणांनी करण्याची आता वेळ आली आहे. पदवीपरीक्षेतील सुलभीकरण आणि पीएच.डी. करण्यासाठी लागणाऱ्या अटींच्या शैथिल्यातून आपण शिक्षण अधिकच सुलभ करण्याच्या दिशेने वाटचाल करू लागलो आहोत. दीर्घकाळाचा विचार करता ते हितावह नाही.