News Update :

और चाबी खो जाय

Tuesday, February 14, 2012


रात्रीत सख्खे शेजारी पक्के वैरी का होतात? या सर्वांच्या मुळाशी एकच कारण आहे आणि ते म्हणजे सत्ता! एका नेत्यानं आपण कोणत्या जातींना किती उमेदवारी दिली, याची यादीच जाहीर सभेत वाचून दाखवली. जणू आमच्या पक्षरूपी मॉलमध्ये सर्व जाती, धर्म, वंश आहेत हेच त्याला सांगायचं असंल. जाती एकत्र आल्यानं कधी लोकशाही येत नाही. तर खरी लोकशाही तेव्हाच जन्माला येते जेव्हा जाती संपतात किंवा संपवण्याचे प्रामाणिक प्रयत्न तरी होतात. आपल्या पक्षाचं तसं नाही. जाती जागवणं म्हणजे लोकशाही जागवणं, असंच काही तरी या बिचाऱ्यांना वाटत असावं. प्रचारात लोकहिताचे प्रकल्प सांगावे लागतात. लोकशाही संवर्धनाच्या गोष्टी सांगाव्या लागतात. पण आताचे नेते शेलक्‍या शिव्या जन्माला घालतात. विवेकहरणापासून वस्त्रहरणापर्यंत अनेक फड उभे करतात. त्यांच्या लक्षातच येत नाहीय किंवा त्यांना लक्षातच घ्यायचं नाही, की मांजरपाटाचे कापड फाडून आवाज काढण्याच्या खेळात स्वतःची, सरकारची, पक्षाची आणि व्यवस्थेची बेईज्जती व्हायला लागते. पूर्वी नेत्यांची अभ्यासपूर्ण भाषणं ऐकण्यासाठी गर्दी व्हायची. आता पशू-पक्ष्यांच्या नावानं शब्दांचे खेळ केले जातात. कधी घोडा, कधी साप, कधी विंचू, कधी कोंबडी, कधी कोंबडा, कधी खुराडे, कधी बैल अशी बरीच मंडळी वापरून नेते फड गाजवतात. जाहीरनामा उडून जातो हास्यकल्लोळात किंवा कोटीकोटींच्या संशयकल्लोळात. नेते हे पेटंट बदलण्याची शक्‍यता नाही, कारण ते सोपे आहे. स्ट्रीट प्लेसारखे आहे. लोकशाहीचा आधार असणाऱ्या मतदारांनी तरी नको का विचार करायला?
Share this Article on :
Related Posts Plugin for WordPress, Blogger...
 

© Copyright संपादकीय अग्रलेख 2010 -2011 | Design by Herdiansyah Hamzah | Published by Borneo Templates | Powered by Blogger.com.