News Update :

महाराष्ट्र टाइम्स

लोकसत्ता

सकाळ

शिवसेनेची झुंडगिरी

Tuesday, February 28, 2012


राजकीय क्षेत्रात झुंडगिरी करायला सोकावलेल्या शिवसेनेने ज्येष्ठ अणुशास्त्रज्ञ डॉ. अनिल काकोडकर यांची मुस्कटदाबी करायसाठी, त्याच तंत्राचा वापर करावा, ही घटना अत्यंत गंभीर आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा गळा घोटणारी आहे. विज्ञान दिनानिमित्त पुण्याच्या आधारकर संशोधन संस्थेत "प्रीपेअरिंग फॉर अवर सिक्युअर एनर्जी फ्युचर' या विषयावर काकोडकरांचे भाषण होणार असल्याचे समजताच शिवसेनेच्या कसबा आणि पर्वती भागातल्या कार्यकर्त्यांनी या संस्थेत घुसखोरी केली. कोणत्याही परिस्थितीत काकोडकरांना जैतापूर अणुऊर्जा प्रकल्पाचे समर्थन करणारे भाषण करू देणार नाही आणि या संस्थेतही ते होवू देणार नाही, असे निवेदन या कार्यकर्त्यांनी संस्थेचे संचालक डॉ. दिलीप रानडे यांना दिले. कार्यकर्त्यांच्या या झुंडगिरीसमोर नमण्याशिवाय रानडे यांना पर्याय राहिला नाही. शिवसैनिकांच्या तालिबानी फतव्याचा स्वीकार करीत त्यांनी विज्ञानदिनानिमित्त होणाऱ्या या कार्यक्रमात जैतापूर विषयी कोणतीही वादग्रस्त विधाने केली जाणार नाहीत, असे लेखी आश्वासन दिल्यावरच, झुंडगिरी करणारे हे कार्यकर्ते संस्थेचा परिसर सोडून निघून गेले. काकोडकर यांनीही भाषणाच्या प्रारंभीच "माझ्या भाषणात जैतापूरच्या अणुऊर्जा प्रकल्पाबाबत काहीही भाष्य नसेल' असे स्पष्ट करूनच व्याख्यान दिले. या पुढच्या काळात ऊर्जेची वाढती गरज भागवायसाठी सौर आणि अणुऊर्जेला पर्याय नसल्याचे प्रतिपादन त्यांनी केले. माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी आणीबाणीच्या काळात वृत्तपत्रांवर प्रसिध्दी पूर्व नियंत्रण (सेन्सॉरशिप) लादली होती. शिवसैनिकांनी दहशत आणि दंडुकेशाहीच्या जोरावर, शिवसेनेचा विरोध असलेल्या  विचारसरणीवर, विकासाच्या प्रकल्पावर, समस्यांवर कुणाला बोलूच देणार नाही, बोलल्यास त्याचे परिणाम चांगले होणार नाहीत, अशा धमक्या देत सुरु केलेली ही झुंडगिरी लोकशाहीला आणि राज्यघटनेने नागरिकांना दिलेल्या मूलभूत स्वातंत्र्यालाही डांबर फासणारी ठरणारी आहे. शिवसैनिकांनी काकोडकरांना अणुऊर्जा प्रकल्पाबाबत बोलू दिले नाही, या घटनेची कार्याध्यक्ष उध्दव ठाकरे यांनी गंभीर दखल घ्यायला हवी होती. पण, त्यांनी याबाबत बोलायचेच टाळले आणि जैतापूरच्या अणुऊर्जा प्रकल्पामुळे तिथल्या माणसांच्या जीवितालाच धोका असल्याचे तुणतुणे वाजवले. सिंधुदुर्ग जिल्ह्यात उद्योगमंत्री नारायण राणे यांनी दहशतवाद निर्माण केल्याचे आरोप वारंवार केले आहेत. राणे यांच्या गुंडगिरीमुळे त्या जिल्ह्यात विरोधकांना-शिवसेनेला मुक्तपणे प्रचार करता येत नाही. शिवसैनिकांची मुस्कटदाबी होते, हा लोकशाही हक्कावर घाला असल्याचा आरडाओरडा खुद्द उध्दव ठाकरे यांनीही केला आहे. शिवसैनिक आणि त्यांच्या नेत्यांना शिवराळ भाषेत विरोधकांवर तुटून पडायचा हक्क आहे, पण त्यांच्या विरोधात कुणीही बोलायचे नाही, ही हुकूमशाही झाली. भारतात अद्याप शिवसेनेचे एकपक्षीय राज्य आलेले नाही. राज्य घटनेनुसार सर्व राजकीय पक्षांना-नागरिकांना मिळालेल्या मूलभूत स्वातंत्र्यानुसार, आपले विचार मुक्तपणे व्यक्त करायचा अधिकार आहे. तो शिवसेनेला काढून घेता येणार नाही. आम्ही आणि आमचे शिवसैनिक वाट्टेल त्या विषयावर बोलू, पण आम्ही कुणाला बोलू द्यायचे हे ठरवणार. ही शिवसेनेची झोटिंगशाही सरकारने मोडून काढायला हवी. काकोडकर काही राजकारणी नाहीत. ते अणुऊर्जा आयोगाचे अध्यक्ष होते. जैतापूरचा अणुऊर्जा प्रकल्प अत्यंत सुरक्षित असल्याची ग्वाही त्यांनी यापूर्वी अनेकदा दिली. जागतिक किर्तीच्या अणुशास्त्रज्ञाला त्याचे विचारच मांंडू द्यायचे नाहीत, ही शिवसैनिकांची कृती म्हणजे कोंबडा झाकून सूर्यप्रकाश अडवण्यातला प्रकार होय. 
...तर काय करणार?
महात्मा गांधीजींनी 1942 च्या चले जाव आंदोलनात, भारतीय जनतेला "करो या मरो', चा मूलमंत्र दिला. सारा देश स्वातंत्र्याच्या चळवळीने धडाडून पेटला. ब्रिटिशांची सत्ता देशातून उखडून टाकायसाठी लाखो स्वातंत्र्यसैनिकांनी या आंदोलनात सरकारी कार्यालयावर हल्ले चढवले. ब्रिटिश सरकारने ही चळवळ सशस्त्र पोलिसांच्या बळावर दडपून टाकायचा केलेला राक्षसी उद्योग अयशस्वी झाला. ब्रिटिशांनी तुरुंगात डांबल्या गेलेल्या महात्माजींना सत्याग्रहींवर गोळ्या घालून स्वातंत्र्य आंदोलन उधळून लावायची धमकी दिली. तेव्हा त्यांनी "वुई आर मेनी, दोज आर फ्यू' अशा शब्दात प्रत्युत्तर दिले होते. लाखो स्वातंत्र्यसैनिकांना मूठभर पोलीस किती आवरणार? या महात्माजींच्या प्रश्नाला ब्रिटिशांच्याकडे उत्तर नव्हते. पुण्यातल्या शिवसैनिकांनी केलेल्या झुंडगिरीचे मूक समर्थन करणाऱ्या उध्दव ठाकरे यांनीही आपण किती ठिकाणी शिवसैनिकांकरवी जैतापूरच्या अणुऊर्जा प्रकल्पाचे समर्थन करणारी भाषणे बंद पाडणार आहोत? महाराष्ट्र वगळता शिवसेनेचे अस्तित्व देशात कुठेही नाही. जैतापूरच्या अणुऊर्जा प्रकल्पाच्या विषयावर राजापूर येथे होणारी राष्ट्रीय ऊर्जा परिषदही शिवसेनेच्या विरोधामुळेच रद्द करण्यात आली. या परिषदेतही डॉ. काकोडकर यांचेच भाषण होणार होते. जैतापूर  अणुऊर्जा प्रकल्पाबाबत कुणीच काही बोलायचेच नाही, हा शिवसेनेचा आक्रमक कार्यक्रम असेल तर, त्याच धोरणानुसार त्यांना प्रत्युत्तर दिले गेल्यास मात्र उध्दव ठाकरे यांनी आरडाओरडा करू नये. शेराला सव्वाशेर असतोच. कोकणात तर नारायण राणे आपल्या राजकीय शक्तीच्या बळावर रद्द केलेली अणुपरिषद रत्नागिरी-मालवणमध्येही निर्धाराने घेवू शकतात. त्यांनी तशी परिषद आयोजित केल्यास तिला विरोध करणाऱ्यांचा ते त्यांच्या पध्दतीने बंदोबस्तही करू शकतील. तेव्हा मात्र राण्यांनी झोटिंगशाही केली, दहशत माजवली, असा कांगावा करायचा अधिकार शिवसेनेला असेल काय? याचा विचार उध्दव ठाकरे यांनी करायला हवा. लोकशाहीत सनदशीर मार्गाने आपले विचार मांडायचा, त्याच्या समर्थनार्थ शांततापूर्ण मार्गाने निदर्शने-आंदोलने करायचा अधिकार सर्वांनाच आहे. पण, तो मान्य न करता काकोडकर यांना जैतापूर अणुऊर्जा प्रकल्पावर बोलूच देणार नाही, हे लोकशाही परंपरेला डांबर फासणारे ठरते. पुण्यातल्या त्या कार्यक्रमात कुणी राजकीय पक्षाचे कार्यकर्ते नव्हते. विचारवंत आणि वैज्ञानिक, विज्ञानाचे अभ्यासक-विद्यार्थी त्या भाषणाला उपस्थित होते. जैतापूर प्रकल्पाचे समर्थक तेथे गेलेही नव्हते. पण सारासार विचार करायचा नाही, आम्ही सांगू तीच पूर्व दिशा असा अट्टाहास लोकशाहीत कुणालाही धरता येणार नाही, रेटताही येणार नाही. याचे भान झुंडगिरीला सोकावलेल्या शिवसेना आणि त्यांच्या नेत्यांनी ठेवायला हवे. आपला तो बाब्या आणि दुसऱ्याचे ते कार्टे, हे फार काळ चालणारे नाही. ठाकरे यांना तो अनुभव त्यांचे बंधू राज ठाकरे देत असलेल्या प्रत्युत्तराने येतो आहे. उद्या देशभरातून जैतापूरच्या प्रकल्पाला पाठिंबा देणाऱ्या परिषदा झाल्यास, ठाकरे त्या कशा बंद पाडणार आहेत? उधळून लावणार आहेत? उपग्रह वृत्तवाहिन्या आणि वृत्तपत्रातून काकोडकर यांच्या जैतापूर प्रकल्याच्या समर्थनाच्या मुलाखती प्रसारित झाल्यास त्या शिवसेना कशा रोखणार आहे? विचारांचा सामना विचारांनीच करायला हवा, ठोकशाहीने नव्हे!

दांभिक वाचाळवीर


दिल्लीतील जंतरमंतर वा रामलीला मैदानात माध्यमांचे कॅमेरे आपल्याकडे वळवण्यात यशस्वी झालेली केजरीवाल-किरण बेदी ही दुक्कल उत्तर प्रदेशातील लोकशाही 'शुद्ध' करण्याच्या पवित्र कर्तव्यासाठी प्रचाराच्या चिखलात उतरली खरी, पण मायावती, राहुल गांधी, अखिलेश यादव आणि उमा भारती यांच्यासारख्यांकडेच लोकांचा आणि माध्यमांचाही ओढा दिसत असल्याने केजरीवाल भलतेच अस्वस्थ झालेले दिसतात. त्यामुळेच 'संसदेत बलात्कारी, खुनी आणि लुटारू बसतात,' असे सनसनाटी विधान करून त्यांनी माध्यमांचे लक्ष स्वत:कडे वेधून घेण्याचा प्रयत्न केला. 

एखाद्याने कमरेचे सोडले तर चार लोकांचे लक्ष जरूर वेधले जाते, पण त्यातून काढला जाणारा निष्कर्ष निश्चितच हवासा नसतो. केजरीवाल यांच्या सवंगपणाला त्यांनी गोळा केलेल्या फेसबुकछाप तरुणाईकडून टाळ्या मिळतीलही, पण त्यातून देशाच्या राजकीय व्यवस्थेतील विकृती दूर करण्यासाठी आवश्यक ती शहाणी सजगता निश्चितच निर्माण होणार नाही. राजकारणाचे गुन्हेगारीकरण हा देशातील लोकशाही व्यवस्थेपुढील गंभीर प्रश्न आहे. पण केवळ निवडणूक आयोगाकडे लोकप्रतिनिधींनी सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रातील माहितीच्या आधारे एखाद्या व्यक्तीवर तो 'खुनी', 'बलात्कारी', 'लुटारू' असे शिक्के मारणे, हा अविचार तरी आहे किंवा जाणूनबुजून केलेली लोकांची दिशाभूल. 

या प्रतिज्ञापत्रात 'आरोपां'चा तपशील असतो. आरोप सिद्ध होत नाहीत तोवर एखाद्याला गुन्हेगार म्हणणे, हे कायद्याच्या प्राथमिक तत्त्वाचे उल्लंघन आहे. हा केवळ तांत्रिक मुद्दा नाही, तर लोकशाहीचा आधार असलेल्या अनेकांपैकी एका मूल्याशी तो निगडित आहे. याचा अवाजवी फायदा गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्तींना होताना दिसतो, हे खरे आहे. पण ज्याच्यावर पोलिसांत गुन्हा नोंदवला गेला आहे, अशा प्रत्येकाची संभावना 'गुन्हेगार' अशी करण्यास मुभा दिली, तर सर्वसामान्यांच्या जगण्याच्या प्रश्ानंवर रस्त्यावर उतरून आंदोलने करणाऱ्या अनेक सच्च्या कार्यकर्त्यांना विधानसभा, लोकसभेचे दरवाजे बंद होतील. किंबहुना लोकमताचे पाठबळ असलेल्या राजकीय प्रतिस्पर्ध्याचा निवडणुकीचा मार्ग बंद करण्यासाठी बनावट गुन्हे नोंदवण्याचे हत्यार वापरले जाऊ शकेल. याचाच विचार करून, दोन वर्षांपेक्षा अधिक शिक्षा असलेला गुन्हा अंतिमत: कोर्टात सिद्ध झाला आहे काय, हा निकष निवडणूक उमेदवारीच्या पात्रतेसाठी लावला गेला आहे. त्यात बदल करून, हे आरोप किमान कनिष्ठ कोर्टात शाबीत झाले आहेत काय, अशी सुधारणा करणे शक्य आहे. यामुळे बनावट आरोप ठेवून काटा काढण्याच्या प्रकारांना आळा घालतानाच, राजकारणात येऊ पाहणाऱ्या गुन्हेगारी प्रवृत्तींना जरब बसवणे शक्य होईल. संसदेच्या ५४३ पैकी १६३ हे 'गुन्हेगार' असल्याचे विधान केजरीवाल करतात, तेव्हा ते प्रतिज्ञापत्रातील आरोप सत्य आहेत हे गृहीत धरतात. 

खुनाचे गुन्हे नोंदविलेल्यांचा आकडा ते १५ असा देतात, पण 'बलात्काऱ्यां'चा आकडा देत नाहीत. त्यामुळे बलात्काराचे आरोप खरोखरच कोणा खासदारावर आहेत काय की पुराव्याशिवाय संसदेची अप्रतिष्ठा करण्याचा जन्मसिद्ध हक्क आपल्याला आहे, असा केजरीवाल यांचा समज आहे, असा प्रश्न पडतो. सामाजिक संस्थांनी प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीत, संबंधित खासदारांपैकी किती जणांवरील आरोप हे निखळ गुन्हेगारी स्वरूपाचे आहेत आणि किती राजकीय आंदोलनांशी निगडित आहेत, याचा कोणताही शोध घेतलेला नाही. त्यामुळे ज्या लोकसभेत ७५ टक्क्यांपेक्षा अधिक खासदार उच्चशिक्षित आहेत, तिची त्याआधारे सरसकट गुन्हेगारांचे कायदेमंडळ म्हणून अप्रतिष्ठा करणे, हे बेजबाबदारपणाचे लक्षण आहे. याच संस्थांची आकडेवारी प्रमाण मानायची, तर २००९ साली त्या त्या राज्यातून निवडून गेलेल्या खासदारांतील 'गुन्हेगार' खासदारांचे प्रमाण उत्तर प्रदेश (३८ टक्के) आणि बिहार (४० टक्के) या राज्यांपेक्षा महाराष्ट्रात (५४ टक्के) अधिक आहे! हा निष्कर्ष मराठी मतदारांच्या पचनी पडेल काय? तपशिलात न जाता केवळ आकडेवारीवरून काढलेले निष्कर्ष दिशाभूल करणारे ठरू शकतात, याचे हे एक उदाहरण. 

'पोलिसांनी नोंदविलेला गुन्हा' हा केजरीवाल यांनीच लावलेला निकष प्रमाण मानायचा, तर त्यांच्या सहकारी किरण बेदी या 'लुटारू' ठरतात; कारण त्यांच्यावर फसवणूक आणि कट रचून पैशाचा अपहार केल्याचे गुन्हे नोंदवले गेले आहेत आणि तेही कोर्टाच्याच आदेशावरून! खुद्द केजरीवाल यांची बनवेगिरीही यापूवीर् प्राप्तिकर खात्याच्या नोटिशीमुळे उघड झाली आहे. या दोन्ही कारवाया राजकीय हेतूने प्रेरित आहेत असा कांगावा करणारे केजरीवाल, खासदारांवर मात्र दुगाण्या झाडतात, तेव्हा त्यांचे हेतू स्वच्छ नाहीत, हे स्पष्ट होते. बिल्डर आणि व्यापाऱ्यांच्या धनशक्तीवर भ्रष्टाचारविरोधी आंदोलन करणाऱ्यांकडून संसदीय राजकारण खच्ची करण्याचे चाललेले प्रयत्न, राजकारणाच्या गुन्हेगारीकरणाइतकेच गंभीर आहेत.

विद्यानगरीत अविद्या


पुण्याला ‘विद्येचे माहेरघर’ म्हणण्याची पद्धत आहे. पुण्यात पद्म पुरस्कार मिळालेल्यांची संख्या मोठी आहे, आंतरराष्ट्रीय दर्जाच्या संस्था आहेत. अशा पुण्यात भारताच्या अणुऊर्जा आयोगाचे माजी अध्यक्ष अनिल काकोडकर यांचे ‘विज्ञानदिनी’ आयोजिलेले भाषण कशामुळे गाजले? संयोजक असलेल्या आघारकर संशोधन संस्थेने शिवसेनेच्या नेत्यांना असे लिहून दिले, की ‘जैतापूरच्या प्रकल्पाबद्दल डॉ. काकोडकर काहीही बोलणार नाहीत.’ याचा अर्थ काय होतो? काकोडकरांसारख्या शास्त्रज्ञाला जैतापूरविषयी मतच व्यक्त करण्यावर स्वयंघोषित बंदी शिवसेनेने लादल्यानंतर आयोजक संस्थेने लेखी हमी देऊन पुण्याची आणि भारताची संस्कृती वाढविली की मागे ओढली? काकोडकरांची मते आघारकरसारख्या संस्थेला माहीत नाहीत, असे असण्याची सुतराम शक्यता नाही. जैतापूरवर बोलण्यासाठी काकोडकरांना निमंत्रित केल्यानंतर दबावाला शरण जाऊन भलतीच भूमिका घेणे हा समाजावर गंभीर परिणाम करणारा दीर्घकालीन सांस्कृतिक पराभव आहे. काकोडकरांची अथवा शिवसेनेची भूमिका हा चर्चेचा विषय असू शकतो; परंतु क्रिकेटचे मैदान उखडणे, चित्रकारांच्या कलाकृतींची मोडतोड करणे, वर्तमानपत्रांच्या कार्यालयांवर हल्ले करणे अशी अभिव्यक्तिस्वातंत्र्याची मुस्कटदाबी करणारी अनेक कामे शिवसेनेने केली आहेत. त्यावर बरीच चर्चा झाली आणि होत असते. कारण, मत व्यक्त करण्याचा अधिकार भारताच्या घटनेने प्रत्येकाला दिला आहे, मत मांडण्याचे स्वातंत्र्य कायद्याने दिले आहे. त्याची गळचेपी म्हणजे कायदा मोडण्याचाच प्रकार आहे. काकोडकर त्यांची मते मांडत असतात. त्याचा कदाचित सरकारला फायदा होत असेलही; परंतु आंतरराष्ट्रीय क्षेत्रात आण्विक कार्यक्रमाबद्दल भारतावर लादलेली जागतिक अस्पृश्यता दूर करण्यासाठी ज्यांनी ४४ देशांच्या यंत्रणांना हाताळले, त्यांचा सरकार वापर करून घेत आहे, अशा प्रकारची शेरेबाजी कोणत्या दर्जाची मानायची? काकोडकरांची भूमिका बरोबर आहे की चूक, याबद्दल मतभेद असू शकतात. केवळ मतभेद आहेत किंवा कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता आहे, या आधारावर चित्रपटापासून व्याख्यानापर्यंतचे कार्यक्रम रोखले जात असतील, तर पुण्यात झालेला बिघाड कोणत्या पातळीवर गेला आहे, याचा विचार झाला पाहिजे. सावित्रीबाई फुलेंनी जेव्हा शाळा काढली, तेव्हा त्यांच्यावर ज्याप्रकारचे हल्ले झाले त्यात आणि काकोडकरांनी कोणत्या विषयावर बोलू नये, याचा निर्णय आघारकर संशोधन संस्थेने घेणे यात गुणात्मक फरक काय? सरकार नावाची गोष्ट अस्तित्वात आहे की नाही, असाही प्रश्न यामुळे पुढे आला आहे. तुमच्या देशाचे अणुऊर्जाक्षेत्रात आंतरराष्ट्रीय नेतृत्व करणार्‍या शास्त्रज्ञाशी आमचे गंभीर मतभेद आहेत; पण आम्ही ते लोकांच्या विचारासाठी मांडतो, अशी भूमिका घेण्याऐवजी दमबाजी करण्याने मूळ प्रकल्पाचा विषय बाजूला पडतो. लोकांनी विचारच करू नये, अशा प्रकारचे वातावरण निर्माण करणे सोपे जाते. त्यातच आयोजक संस्था आणि सरकार हे बघ्याची भूमिका घेणार असतील, तर अशा झुंडशाहीला सत्तेचाही पाठिंबा आहे, असाच अर्थ सामान्य माणसापर्यंत पोहोचतो. विचार आणि प्रचार यांतील अंतर पुसले जाते.

http://onlinenews1.lokmat.com/php/detailednews.php?id=EditorialEdition-16-1-28-02-2012-f3a30&ndate=2012-02-29&editionname=editorial

तहान आणि विहीर!


देशातील जनता आज तहानली आहे. केंद्रातील सरकारने आता तरी नदीजोड प्रकल्पाची ‘विहीर’ खोदण्याचे काम हाती घ्यायला हवे! 
तहान आणि विहीर!देशातील प्रमुख नद्यांना एकमेकांशी जोडण्याचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प लवकरात लवकर पूर्ण करा असे आदेश सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारला दिले आहेत. मुळात नद्यांना जोडून दुष्काळी आणि कमी पाणी असलेल्या भागापर्यंत पाणी पोहोचवण्याची ही योजनाच अफलातून आहे. अटलबिहारी वाजपेयी यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे सरकार केंद्रात सत्तेवर असताना या प्रकल्पाची मुहूर्तमेढ रोवली गेली. पण नंतरच्या निवडणुकीत ‘रालोआ’चा पराभव झाला. वाजपेयी सरकार गेले आणि सत्तेवर आलेल्या कॉंग्रेस आघाडीच्या यूपीए सरकारने देशाला नवसंजीवनी देणारा हा प्रकल्पच बासनात गुंडाळून ठेवला. मात्र आता सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशामुळे का होईना केंद्रातील मनमोहन सरकारला नदीजोड प्रकल्पाच्या फाईल्स आणि अहवालांवरील धूळ झटकावी लागेल. केंद्रातील कॉंग्रेजी सरकारची अवस्था हल्ली ‘सांगकाम्या’सारखी झाली आहे. सुप्रीम कोर्टाने कान पिळल्याशिवाय हे सरकार जागचे हलतच नाही. राष्ट्रकुल आणि २ जी घोटाळ्यांमध्ये सर्वोच्च न्यायालयाने कानफटात लगावली तेव्हा कुठे सरकार पुढे सरकले. नदीजोड प्रकल्पाच्या अंमलबजावणीबाबतही हेच घडले आहे. ‘नदीजोड प्रकल्प राष्ट्रहिताचा असून तो शक्य तितक्या लवकर पूर्ण करा, असे आदेश सर्वोच्च न्यायालयाला द्यावे लागले. म्हणजे ‘राष्ट्रहित’ कशात आहे हे कॉंग्रेजी सरकारला कान धरून सांगावे लागते हाच याचा अर्थ आहे. सवाशे कोटी लोकसंख्या असलेल्या हिंदुस्थानात पाण्याचे प्रचंड दुर्भिक्ष आहे. कमी पर्जन्यमान आणि प्रतिकूल नैसर्गिक परिस्थिती यामुळे देशातील अनेक भागांत कायम दुष्काळसदृश परिस्थिती असते. याउलट काही भागांत अतिवृष्टीमुळे महापूर येऊन मोठी हानी होते. उत्तर हिंदुस्थान आणि ईशान्येकडील राज्यांतून वाहणार्‍या नद्यांच्या पुरात दरवर्षी हजारो गावे जलमय होतात. ब्रह्मपुत्रा नदी प्रत्येक वर्षी कोपते आणि पुराचे पाणी काझीरंगा अभयारण्यात घुसते. हजारो वन्यप्राणी मृत्युमुखी पडतात. गंगा आणि कोसी नदीच्या महापुराचा उत्तर प्रदेश, बिहारला तडाखा बसतच असतो. दरवर्षी अनेकदा कुठे कोरडा दुष्काळ तर कुठे ओला दुष्काळ. हिंदुस्थानसारख्या खंडप्राय देशात ही परिस्थिती अटळ आहे. मात्र त्यातून मार्ग काढण्यासाठीच नदीजोड प्रकल्प अस्तित्वात आला. देशातील ३० प्रमुख नद्यांना एकमेकांशी जोडण्याची योजना आखण्यात आली. हिमालय आणि आसपासच्या प्रदेशातून प्रचंड वेगाने उत्तर हिंदुस्थानात आदळणार्‍या गंडक, कोसी, गंगा, यमुना, ब्रह्मपुत्रा, महानदी, साबरमती आदी नद्यांना १४ ठिकाणी जोडण्याचा या योजनेत समावेश आहे. याशिवाय दक्षिण हिंदुस्थानात गोदावरी, महानदीचे अतिरिक्त पाणी कृष्णा, वैगाई व कावेरी या नद्यांमध्ये सोडण्यासाठी १६ ठिकाणी कालवे काढण्याची कल्पना आहे. महापुराचा उपद्रव कमी करण्याबरोबरच कोरड्या नद्यांच्या पात्रात पाणी पोहोचवणे, मोठी धरणे उभारून ३४ हजार मेगावॅट वीजनिर्मिती करण्याचे उद्दिष्ट आखण्यात आले होते. रालोआ सरकारमधील पर्यावरणमंत्री सुरेश प्रभू यांनी ‘टास्क फोर्स’चे प्रमुख या नात्याने या प्रकल्पावर मेहनत घेतली होती. २०१६ पर्यंत हा प्रकल्प पूर्ण करण्याचे वाजपेयी सरकारने ठरवले होते, पण नंतर सत्तेवर आलेल्या कॉंग्रेसच्या करंट्या कारभारामुळे एका चांगल्या प्रकल्पाची ‘वाट’ लागली. हा प्रकल्प वेळेत पूर्ण झाला असता तर त्यावर पाच लाख कोटी रुपयांचा खर्च झाला असता. ही रक्कम उभी करणेही सोपे नव्हते, पण वाजपेयी सरकारला श्रेय मिळू द्यायचे नाही या राजकारणातून मौल्यवान १० वर्षे वाया गेली. महापुराचे बरेच पाणी पुलांखालून वाहून गेले. आता या प्रकल्पाचा खर्च चार पटीने वाढला असेल. आवाक्याबाहेर असणारा हा अवाढव्य निधी कसा आणि कुठून उभा करायचा, असा प्रश्‍न सरकारसमोर आहे. प्रकल्प रखडवणार्‍या कॉंग्रेजी सरकारनेच आता या प्रश्‍नाचे उत्तर देशातील जनतेला द्यायला हवे. रालोआ सरकारने पुढच्या ५० वर्षांचा अंदाज घेऊन तहान लागण्यापूर्वीच ‘विहीर’ खोदली होती. कॉंग्रेसने त्यावर माती टाकली. देशातील जनता आज तहानली आहे. केंद्रातील सरकारने आता तरी नदीजोड प्रकल्पाची ‘विहीर’ खोदण्याचे काम हाती घ्यायला हवे! 
चिन्यांचा थयथयाटचीन काय किंवा पाकिस्तान काय, हिंदुस्थानचा जेवढा लचका तोडता येईल तेवढा तोडायचा, याच एका महत्त्वाकांक्षेने पछाडलेले आहेत. पाकिस्तानचा डोळा पाकव्याप्त कश्मीरसह संपूर्ण जम्मू-कश्मीरवर आहे. हिंदुस्थानातही ठिकठिकाणी दहशतवादाच्या जोरावर त्यांनी ‘मिनी पाकिस्ताने’ निर्माण केलीच आहेत. चिनी माकडांचेही उद्योग हिंदुस्थानचा सीमा भाग गिळंकृत करण्यासाठी सुरूच आहेत. त्यासाठी कश्मीरच्या सीमांपासून सिक्कीम-अरुणाचल प्रदेशपर्यंत चीन कुरापती काढत असतो. सिक्कीम आणि अरुणाचल तर चीनचाच हिस्सा आहे, असे नकाशात दाखविण्यापर्यंत त्यांची मजल गेली आहे. आताही हिंदुस्थानी संरक्षणमंत्री ए. के. ऍन्टोनी यांच्या अरुणाचल दौर्‍याला चीनने आक्षेप घेतला. याआधी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्या अरुणाचल भेटीच्या वेळीही असेच घडले होते. मुळात चिनी लालभाईंनी अरुणाचलबाबत या माकडउड्या मारण्याची गरजच काय? अरुणाचल प्रदेश हा हिंदुस्थानचाच अविभाज्य भाग आहे. त्या ठिकाणी जर हिंदुस्थानी पंतप्रधान, संरक्षणमंत्री किंवा आणखी कोणी दौर्‍यावर जात असतील तर चिनी राज्यकर्ते कशासाठी थयथयाट करीत आहेत? चीनचे राष्ट्राध्यक्ष हु जिन्ताओ पुढील आठवड्यात दिल्लीत होणार्‍या ब्राझील, रशिया, हिंदुस्थान आणि चीन या चार देशांच्या ‘ब्रिक’ शिखर परिषदेसाठी येत आहेत. त्यावेळी त्यांची पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्यासोबत भेटही होणार आहे. तरीही चीन अरुणाचलच्या नसलेल्या वादाला फोडणी घालतो याचाच अर्थ स्पष्ट आहे, चिनी राजकर्त्यांना हा सीमावाद येनकेनप्रकारेण सुरूच ठेवायचा आहे. अर्थात चीन असे धाडस वारंवार दाखवितो याचे कारण आमच्या पुचाट राज्यकर्त्यांमध्ये आहे. हिंदुस्थानी राज्यकर्ते निषेधाचे खलिते पाठविण्याखेरीज, विरोधाचे बुडबुडे हवेत सोडण्याखेरीज काहीच करू शकत नाहीत, हे चिनी सत्ताधार्‍यांना पक्के माहीत आहे. आतादेखील संरक्षणमंत्री ऍन्टोनी ‘चीनचा आक्षेप दुर्दैवी आहे’, असे म्हणाले. वास्तविक चीनला यापेक्षाही कठोरपणे खडसावण्याची गरज होती. परराष्ट्रमंत्री एस. एम. कृष्णा यांनीही म्हणे चीनची लुडबुड खपवून घेणार नाही असा दम भरला आहे. अर्थात अशी दमबाजी आजपर्यंत अनेकदा झाली आहे. तरीही चिन्यांच्या कुरापती सुरूच आहेत. चीनच्या विश्‍वासघाताचा अनुभव आपल्याला १९६२ पासून आहे. हिंदुस्थानी राज्यकर्त्यांच्या गाफीलपणाची जबर किंमत आपल्या देशाने मोजली आहे. तरीही आमचे राज्यकर्ते ताठ कणा दाखवायला तयार नाहीत. हिंदुस्थानच्या शेजारी देशांशी संरक्षणविषयक करार करून हिंदुस्थानभोवती विळखा घालण्याची नीती चिनी ‘ड्रॅगन’ राबवीत आहे. त्या जोडीला सीमावादाची फोडणी अधूनमधून जाणीवपूर्वक तो देत असतो. ऍन्टोनी यांच्या अरुणाचल दौर्‍यावरून चिन्यांनी केलेला थयथयाट याच धोरणाचा भाग आहे.
 http://www.saamana.com/

शिवसेनेची विचारबंदी!


जैतापूर प्रकल्पाबाबत बोलण्यास डॉ. अनिल काकोडकर यांना "बंदी' करण्यामागे शिवसेनेचे राजकारण तर आहेच; पण हुकूमशाही मनोवृत्तीचे दर्शनही आहे. 

आपल्या विज्ञाननिष्ठ भूमिकेबद्दल सॉक्रेटिससारख्या ज्येष्ठ ग्रीक संशोधक-तत्त्ववेत्त्याला विषाचा प्याला सक्‍तीने प्राशन करायला लावणारे महाभाग पाचव्या शतकात जन्माला आले होते. सॉक्रेटिसबरोबर तेही संपलेले असतील, असे वाटत होते; पण प्रत्येक काळात ते असतात कोणत्या ना कोणत्या रूपात आणि विचारांवर दडपण आणत असतात. शिवसेनेनेही अशीच भूमिका करायचे ठरविले आहे की काय, असे वाटत आहे. मुंबई महापालिकेतील आपली सत्ता कायम राखण्यात यश आल्यानंतर शिवसैनिकांनी आपल्या ताकदीचा दणका ज्येष्ठ अणुशास्त्रज्ञ डॉ. अनिल काकोडकर यांना दिला आणि जैतापूर अणुऊर्जा प्रकल्पाबाबत एक शब्दही ते काढणार नाहीत, असे लेखी आश्‍वासन संयोजकांनी दिल्यानंतरच काकोडकर यांचे भाषण पार पडू शकले. "मराठीदिना'चा मुहूर्त साधून आणि मुख्य म्हणजे राष्ट्रीय विज्ञानदिनानिमित्ताने पुण्यातील आघारकर संशोधन संस्थेच्या वतीने आयोजित कार्यक्रमात डॉ. काकोडकर यांना हा इंगा दाखवून आपण विरोधातील कोणतीही बाब ऐकून घ्यायलाही कसे तयार नसतो, तेच शिवसैनिकांनी दाखवून दिले. यात राजकारण तर आहेच; पण कोणत्याही क्षेत्रात आपलाच शब्द "प्रमाण' मानला जावा, या हुकूमशाही मनोवृत्तीचे दर्शनही आहे. खरे तर जैतापूर अणुऊर्जा प्रकल्पाला शिवसेनेने विरोध केल्यापासून कोकणात या विषयावरून पडलेले दोन तट अधिकच उग्र झाले आहेत. त्यातच राज ठाकरे यांनी या प्रकल्पाला पाठिंबा देण्याची भूमिका घेतली आणि नारायण राणे यांनी "कोण हा प्रकल्प होऊ देत नाही, तेच बघतो!' अशी आरोळी ठोकली. तेव्हा कोकणात रण पेटले होते. जैतापूर परिसरात अणुऊर्जा प्रकल्प व्हावा की नाही, याबाबत दुमत असू शकते आणि त्याची नको तितकी साधकबाधक चर्चा झाल्यावर हा विषय मागे पडला होता. पण त्यासंबंधात अणुऊर्जा क्षेत्रातील डॉ. काकोडकर यांच्यासारख्या ज्येष्ठ वैज्ञानिकाचे म्हणणेही ऐकून न घेण्याची भूमिका शिवसैनिकांनी अचानक घेतल्यामुळे त्यांच्या एकाधिकारवादी स्वभावावरच पुन्हा एकदा प्रकाश पडला आहे. त्याचे कारण म्हणजे या प्रकल्पासंबंधीचा तपशील स्पष्ट करण्यासाठी विधिमंडळातच डॉ. काकोडकर यांचे भाषण काही महिन्यांपूर्वी आयोजित केले होते. त्या वेळी शिवसेनेचेही विधिमंडळ सदस्य उपस्थित होते. पण त्याहीपेक्षा महत्त्वाची बाब म्हणजे, शिवसेनेशी संबंधित "प्रबोधन' संस्थेतर्फेच काही महिन्यांपूर्वी डॉ. काकोडकर यांचे याच विषयावरील भाषण आयोजित करण्यात आले होते. पण या साऱ्याचा विसर पुण्यातील शिवसैनिकांना पडला आणि त्यांनी डॉ. काकोडकर यांचा आवाज बंद करण्याचा प्रयत्न केला आणि आपली "यत्ता कोंची' ते दाखवून दिले. 

अर्थात, हे जे काही घडले ते शिवसेनेच्या आजवरच्या लौकिकास साजेसेच घडले. शिवसेनेच्या मनगटशाहीचा दणका आजवर अनेकांना मिळाला आहे. आश्‍चर्य आहे, ते शिवसेनेचे कार्यकारी अध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी केलेल्या शिवसैनिकांच्या वर्तनाच्या समर्थनाचे. डॉ. काकोडकर यांची भूमिका जैतापूर प्रकल्प व्हावा, अशी आहे आणि ती सर्वश्रुत आहे. अशा परिस्थितीत जैतापूर प्रकल्प झाला आणि त्यामुळे काही अनावस्था प्रसंग गुदरला, तर त्याची जबाबदारी कोण घेणार, असा सवाल उद्धव ठाकरे यांनी या घटनेचे समर्थन करताना केला आहे. शिवसेनेची सूत्रे हाती आल्यावर उद्धव ठाकरे यांनी सुरवातीच्या काळात सर्वसमावेशक भूमिका घेतली होती. त्यामुळे बाळासाहेबांपेक्षा या नव्या ठाकरेंचा बाणा वेगळा दिसतो, अशी चर्चा सुरू झाली होती. पण, आता त्यांनाही "बाळासाहेब' व्हायचेच वेध लागलेले दिसतात. आपल्या भूमिकेच्या परिघात शिवसैनिकांनी एखादे आंदोलन उत्स्फूर्तपणे केल्यास, शिवसेनाप्रमुख त्यांना लगोलग पाठिंबा जाहीर करत असत. अर्थात, पुण्यातील सैनिकांनी हे आंदोलन पक्षाला विचारून केले होते की नाही, ते स्पष्ट झालेले नाही. पण ज्या पद्धतीने पुण्यापाठोपाठ आमदार राजन साळवी यांनी रत्नागिरीतही डॉ. काकोडकर यांचे भाषण होऊ न देण्याचा पवित्रा लगोलग घेतला, त्यावरून आता "काकोडकरांना अडवा!' हा शिवसेनेचा एककलमी कार्यक्रम झालेला दिसतो. त्यानिमित्ताने अनेक प्रश्‍न निर्माण झाले आहेत. आपल्या देशाला गौरवास्पद ठरलेल्या पोखरण अणुऊर्जा कार्यक्रमाचे डॉ. काकोडकर प्रमुख सूत्रधार होते. त्यांच्या संरक्षणाची जबाबदारीही त्यानिमित्ताने सरकारवर येते. सरकारने तसे काही संरक्षण डॉ. काकोडकर यांना पुरवले आहे काय? की सरकारची भूमिका शिवसेनेची मनमानी चालू देण्याचीच आहे? या प्रश्‍नाची उत्तरे थेट मुख्यमंत्र्यांकडून अपेक्षित आहेत. त्याचबरोबर उद्धव ठाकरे यांनीही कोणत्याही विषयाची दुसरी बाजू आपण ऐकून तरी घेणार आहोत की नाही, या प्रश्‍नाचे उत्तर द्यावयास हवे. अन्यथा, पुरोगामी महाराष्ट्रात विचारस्वातंत्र्य आहे की नाही, असेही प्रश्‍न निर्माण होत राहतील. सत्तास्थानाच्या खेळात रमलेल्या सर्वांनाच त्याची उत्तरे द्यावी लागतील. महाराष्ट्र मुद्‌द्‌यांकडून गुद्यांकडे जाणार आहे का, हेही सांगावे लागेल.

न्यायालयीन अन्याय


सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी केंद्र सरकारला राष्ट्रीय नदीजोड प्रकल्प पुढील पाच वर्षांत पूर्ण करण्याचा आदेश दिला. या प्रकल्पाच्या कामावर देखरेख ठेवण्यासाठी तज्ज्ञांची समिती नियुक्त करण्याची शिफारसही सर्वोच्च न्यायालयाने केली आणि वेगवेगळय़ा राज्य सरकारांच्या मनात या प्रकल्पाविषयी असलेल्या शंका दूर करण्याच्या कामास लागण्यास या समितीस बजावले. हे सगळेच अतक्र्य म्हणायला हवे.
सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयामुळे काही गंभीर प्रश्न निर्माण होतात. त्याची उत्तरे वेगवेगळय़ा यंत्रणांतील निरोगी परस्परसंबंधांसाठी मिळणे आवश्यक आहे. यातील पहिला मुद्दा हा की नदीजोड प्रकल्पाचा मुद्दा सर्वोच्च न्यायालयात जावा असे काहीही घडलेले नाही. म्हणजे या संदर्भात कोणी जनहित याचिका दाखल केली होती आणि ती निकालात काढताना न्यायालयाने हा आदेश दिला, असे घडलेले नाही. तर सरन्यायाधीश कपाडिया यांनी स्वत:हून या प्रकरणी लक्ष घातले आणि केंद्रास खडसावले. याची गरज होती का? एखादा प्रकल्प राबवायचा की नाही हा प्रशासकीय निर्णय असतो. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाने आपली भूमिका आणि मर्यादा या निर्णयामुळे ओलांडल्या का असा प्रश्न उपस्थित होऊ शकतो आणि त्याचे उत्तर होकारार्थीच असू शकते. तेव्हा सर्वोच्च न्यायालयास यापुढे न्यायदानाबरोबर प्रशासनाची जबाबदारीही घ्यावयाची आहे काय? याआधी काळय़ा पैशाच्या मुद्यावर सर्वोच्च न्यायालयाने स्वत:च्याच नियंत्रणाखाली चौकशी समिती नेमण्याची घोषणा केली होती. तेव्हाही तो मर्यादाभंगच होता आणि आताही न्यायालयाची वाटचाल त्याच दिशेने सुरू आहे. नद्या जोडण्यासारख्या अवाढव्य प्रकल्पास अनेक अंगे असतात. त्यातील निम्म्याही मुद्यांवर अद्याप चर्चा झालेली नसताना तो थेट राबवा म्हणून सांगणे हा अगोचरपणा झाला आणि तो सर्वोच्च न्यायालयाकडून अपेक्षित नाही. अनेक प्रशासकीय निर्णयांप्रमाणे हा निर्णयही प्रशासनाच्या प्रमुखाने घ्यावयाचा आहे. सर्वोच्च न्यायालयाने परस्पर तो जाहीर करून नदीजोड प्रकल्पासंदर्भात ही संधी प्रशासन प्रमुखास नाकारली आहे. त्यात हा नदीजोड प्रकल्प अत्यंत अव्यवहार्य आहे अशी अनेक तज्ज्ञांची भूमिका आहे. त्यातील कोणाशी सर्वोच्च न्यायालयाने चर्चा केली काय? केली नसल्यास त्या शिवाय असा निर्णय देणे कितपत योग्य आहे. कारण असे प्रकल्प हे केवळ कायद्याच्या नजरेतून जोखायचे नसतात. खेरीज, आपला निर्णय देण्याआधी हा प्रकल्प व्हायलाच हवा असा आग्रह असणाऱ्यांशीदेखील कधी सर्वोच्च न्यायालयाने चर्चा केली वा त्यांच्याकडून हा विषय समजून घेतला असे झाले आहे काय? न्यायालयाने हे केले असेल तर यातील कोणाशी चर्चा झाली याचाही तपशील त्यांनी द्यायला हवा. आणि केले नसेल तर असे काही न करता न्यायालय इतका मोठा निर्णय कसा काय लादू शकते, असा प्रश्न उपस्थित होतो. या प्रकल्पाची मूळ कल्पना माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांची. त्यांच्या सरकारातील अभ्यासू मंत्री सुरेश प्रभू यांनी जोरकसपणे ती पुढे रेटली आणि परिणामी अनेकांचे मत या प्रकल्पास अनुकूल बनले. परंतु आपल्यासारख्या खंडप्राय देशात हा प्रकल्प कितपत व्यवहार्य ठरू शकेल, याविषयी काही गंभीर मुद्दे आहेत. सर्वसाधारण पातळीवर नद्या जोडण्याची कल्पना आकर्षक वाटते आणि त्यामुळे कमी पाणीवाल्या प्रदेशात दुथडी भरून वाहणाऱ्या नद्यांतील पाणी सोडता येऊन दुष्काळास तोंड देणे शक्य होईल या कल्पनेने सामान्य माणूस मोहरून जातो. ते साहजिकही म्हणायला हवे. परंतु असे होताना सामान्य माणसाच्या मनात देशाची भूमी ही एक सपाट प्रतल आहे असे चित्र असते आणि वेगवेगळे कालवे काढून ही नदी त्या नदीस जोडली की झाले, असे त्यास वाटते. परंतु वास्तव तसे नाही. तसा विचार करायचा झाल्यास उभ्या भिंतीवरील दोन जलप्रवाह एकमेकांना जोडण्याच्या प्रयत्नांचा विचार केल्यास यातील अडचणी लक्षात येतील. येथे तर देशपातळीवर तब्बल ३० नद्या एकमेकांना जोडणे अपेक्षित आहे. शिवाय त्या जोडताना विंध्य पर्वतांची रांग, सहय़ाद्रीचे खोरे, निलगिरी पर्वत आणि खोल दऱ्या यांचाही विचार करावा लागणार आहे. अशा परिस्थितीत देशाच्या उत्तरेकडे असलेल्या नद्यांतून दक्षिणेकडे असणाऱ्या नद्यांत पाणी नैसर्गिक प्रवाहाने वाहत जाणे गृहीत धरायला हवे. परंतु आपल्याकडे तसेही होणे अवघड आहे. याचे कारण उत्तर आणि दक्षिण भागांस विभागणाऱ्या पर्वतरांगा. अशा परिस्थितीत हिमालयाच्या कुशीतून उगम पावणाऱ्या गंगेतील पाणी दक्षिण दिग्विजयी कावेरीत कसे जाणार? किंवा उलटी गंगा वाहत न्यावयाची असल्यास दक्षिणेकडील नद्यांतील पाणी उत्तरेकडील नद्यांत कसे सोडणार? तसे ते सोडायचे असेल तर हजारो अश्वशक्तीचे विद्युत पंप वापरावे लागणार असून त्यासाठी कित्येक मेगावॅट वीज लागणार आहे. या नदी जोडणी प्रकल्पांमुळे ठिकठिकाणी जलाशय निर्माण होतील आणि त्यांतील जलसाठय़ांवर जलविद्युत प्रकल्प तयार करता येतील, असे या प्रकल्पाचे पुरस्कर्ते सांगतात. हा भाबडा आशावाद झाला. भाबडा अशासाठी की त्यातून वीजनिर्मिती होईल, हे मान्य. परंतु या प्रकल्पासाठीच इतकी वीज लागणार आहे की एकूण गोळाबेरीज केल्यानंतर श्रीशिल्लक फारशी काही राहणार नाही, हे अनेकांनी दाखवून दिले आहे. २००२ साली या प्रकल्पाची पहिल्यांदा मांडणी झाली त्या वेळी या प्रकल्पाचा अंदाजित खर्च किमान पाच लाख कोटी रुपये इतका अपेक्षित होता. आता दहा वर्षांनंतर त्यात २०टक्के वाढ गृहीत धरली तरी ती रक्कम अवाढव्य होईल. याचा साधा अर्थ असा की, देशाचे दोन-पाच वर्षांचे सारे अर्थसंकल्प याच प्रकल्पासाठी सरकारला वापरावे लागतील. इतका पैसा कोठून आणायचा? आणि पाटबंधारे प्रकल्पांच्या पूर्ततेनंतर त्यातून संपत्तीनिर्मितीस किमान सहा ते दहा वर्षांचा कालावधी लागतो. हे झाले सर्वसाधारण प्रकल्पांबाबत जेथे एखादे धरण बांधले जाते. परंतु नदीजोड प्रकल्पात तब्बल ३० नद्या एकमेकांशी जोडल्या जाणे अपेक्षित आहे. तेव्हा या प्रकल्पाचा आकार लक्षात घेता त्यावर होणारा खर्च आणि नंतर मिळणारे संभाव्य फायदे याचे त्रराशिक शुद्ध विचाराच्या पातळीवर मांडले जाणे गरजेचे आहे. तसे ते गेल्यास या प्रकल्पांतील धोके लक्षात येऊ शकतील. हे ज्यांच्या लक्षात आले आहेत अशा अनेक तज्ज्ञांनी महाकाय ३० नद्यांना जोडणारा प्रकल्प हाती घ्यायच्या ऐवजी प्रादेशिक पातळीवर नद्या जोडल्या जाव्यात असे सुचवले आहे आणि ते अधिक व्यवहार्य आहे. म्हणजे दक्षिणेत त्या प्रांतातीलच नद्या जोडायच्या आणि उत्तरेत तेथील. या शिवाय सर्वोच्च न्यायालयास अभिप्रेत असलेला नदीजोड प्रकल्प आहे तसाच राबविला तर दुसरा धोका संभवतो. तो असा की या प्रकल्पांमुळे जलसंधारणाच्या इतर सोप्या, साध्या आणि सहजसाध्य उपायांकडे दुर्लक्ष होण्याचा. नद्या एकमेकींना जोडल्या गेल्यावर मुबलक पाणी उपलब्ध होणारच आहे तेव्हा काटकसर कशाला करा, अशी भावना प्रबळ होऊ शकते, असे अनेक पर्यावरण अभ्यासकांनी दाखवून दिले आहे.
परंतु सर्वोच्च न्यायालयाने यातील कोणताही विचार केला नाही आणि उचललेली जीभ टाळय़ाला लावावी इतक्या सहजपणे कोणत्याही साधकबाधक चर्चेशिवाय इतका दूरगामी निर्णय देऊनही टाकला. हा न्यायालयीन अन्याय असून त्या विरोधात तरी मनमोहन सिंग सरकारने खंबीर भूमिका घेणे गरजेचे आहे. सर्वोच्च न्यायालय आहे म्हणून त्यांचे सर्व काही बरोबर असते असे सरकारने-आणि आपणही-मानायचे काहीही कारण नाही.

पोपटाची नवी गोष्ट

Monday, February 27, 2012


बादशहा अकबराने परगावला जाताना आपल्या लाडक्या पोपटाची उत्तम काळजी घ्यावी, असा हुकूम हुजऱ्याला देतानाच जर हा पोपट मेला, तर तुलाही फाशी देईन, असा दम दिला. बादशहा निघून गेला. त्याचा सेवक इमाने-इतबारे बादशहाच्या लाडक्या पोपटाला वेळच्या वेळी अन्न-पाणी देत होता. पण एक दिवस पोपट आजारी पडला व मेला. आपल्याला आता फाशीची शिक्षा होणार, अशा भितीने सेवक घाबरून गेला. त्याने बिरबलाकडे धाव घेतली. त्यानेही तू काळजी करू नकोस, खाविंद येतील तेव्हा बघू, असे सांगितले. काही दिवसांनी अकबर बादशहा परत आला. त्याने त्या सेवकाला तडकाफडकी बोलावून घेतले. माझा पोपट कुठे आहे? तो व्यवस्थित आहे ना? असा प्रश्न विचारला, तेव्हा सेवकाने तो सध्या बिरबलाकडे असल्याचे सांगितले. अकबराने बिरबलाला बोलावून घेवून, पोपटाची विचारपूस केली. बिरबल धूर्तपणे म्हणाला, खाविंद आपला पोपट ठिक आहे. पण तुम्ही परगावी गेल्यावर त्याने तुमची हाय खाल्ली. तो सतत तुम्हाला शोधत होता. त्याच्या आवडीची डाळ, पेरू, मिरची खायला दिली तरी, त्याने त्याला तोंड लावले नाही. पाणीही प्यायला नाही. तो आजारी पडला. मिठू मिठू बोलेनासा झाला. त्याने मान टाकली. आता तो तसाच पिंजऱ्यात पडला आहे. अकबराने केलेले वर्णन ऐकल्यावर अकबर म्हणाला, अरे मग तो पोपट मेला म्हणून का सांगत नाहीस? बिरबल म्हणाला, खाविंद मी तसे कसे सांगणार? कारण तो मेल्याचे सांगितल्यास तुम्ही त्या सेवकाला फाशी द्याल. बादशहा काय ते उमगला. त्याने सेवकाला अभय दिले. ही झाली बिरबल-अकबराची गोष्ट. अकबराने सत्य वस्तुस्थिती स्वीकारली. उदारपणे सेवकाला क्षमाही केली. पण सध्याच्या सत्ताधिशांना आणि लोकप्रतिनिधींना  म्हणजेच खासदारांना सत्य सांगणे हा गुन्हा वाटत असल्याचे अरविंद केजरीवाल यांनी अलिकडेच संसदेतल्या काही खासदारांना उद्देशून केलेल्या वक्तव्याने उघडकीस आले. उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत मतदारांनी स्वच्छ-निष्कलंक चारित्र्याच्या उमेदवारांनाच निवडून द्यावे, असे आवाहन केजरीवाल आणि त्यांचे सहकारी गेले महिनाभर या राज्यात जाहीर प्रचारसभांद्वारे करीत होते. या जनजागृती अभियानाचा ग्रेटर नोएडा येथे समारोप करताना त्यांनी, संसदेत खुनी आणि बलात्कारी सदस्य  असल्यामुळेच जनपाल लोकपाल विधेयक मंजूर होणे अवघड झाल्याचे वक्तव्य केले.  बलात्कार-खून यांसह विविध गुन्हेगारीचे आरोप असलेल्या खासदारांचेच संसदेत वर्चस्व असल्याने, या असल्या कलंकित प्रतिमेच्या नेत्यांना संसदेतून बाहेर काढायसाठी दुसऱ्या स्वातंत्र्याची लढाई सुरु ठेवण्याशिवाय पर्याय राहिलेला नाही. संसदेत सध्या असे गंभीर आरोप असलेल्या खासदारांची संख्या 167 असल्याने, संसदेची प्रतिमाही कलंकित झाली आहे, असेही ते म्हणाले. मुलायमसिंग यादव, लालूप्रसाद यादव, ए. राजा यांच्यासारखे लोक संसदेत बसून देशाचे कायदे बनवित असतील तर, लोकहिताचे कायदे कसे होणार, असा सवालही त्यांनी केला. केजरीवाल यांनी केलेले वक्तव्य हे सत्य असले तरी, त्यांनी ज्या आक्रमकपणे रोखठोक शब्दात काही खासदारांवर केलेले घणाघाती आरोप सर्वच राजकीय पक्षांच्या नेत्यांना झोंबणारे ठरले आहेत. केजरीवाल यांनी असे चिथावणीखोर वक्तव्य करून संसदेचा अवमान तर केलाच, पण संसदेच्या प्रतिष्ठेलाही चूड लावल्याने त्यांच्यावर हक्कभंगाचा प्रस्ताव दाखल करायची धमकी राष्ट्रीय जनता दलाच्या नेत्यांनी दिल्यामुळे, हा नवा संघर्ष गाजायची चिन्हे आहेत. 
संसदेची प्रतिष्ठा 
भारतीय लोकशाहीची सार्वभौम संस्था असलेल्या संसदेची प्रतिष्ठा केजरीवाल यांच्या आरोपांनी कलंकित झाली की नाही, याचा निर्णय त्यांच्यावर हक्कभंगाचा प्रस्ताव संसदेत दाखल झाल्यास ठरेल. भारतीय जनता पक्ष, कॉंग्रेस, समाजवादी पक्षासह बहुतांश पक्षाच्या नेत्यांनी केजरीवाल यांनी हे भडकावू वक्तव्य करून संसदीय लोकशाहीत मिळालेल्या मूलभूत हक्कांचा मर्यादाभंग केल्याचा आरोप केला. अण्णा हजारे यांच्या लोकसंघटनेतले लोक विचारहीन आहेत, ते फक्त सरकार आणि लोकप्रतिनिधींना शिवीगाळ करतात, जनतेत त्यांना आधार नाही, हिंमत असेल तर त्यांनी निवडणुका लढवाव्यात, अशी आव्हानेही काही नेत्यांनी दिली. राष्ट्रीय जनता दलाचे प्रवक्ते रामकृपाल यादव यांनी, केजरीवाल यांच्यावर राजद्रोहाचा खटला दाखल करावा, अशी मागणी केली. त्यांना वेड्याच्या रुग्णालयात पाठवायला हवे, असेही ते म्हणाले. लालूप्रसादांना केजरीवाल यांची टीका झोंबणे अपेक्षित होतेच. चारा घोटाळ्यात अडकलेले लालू लोकप्रतिनिधी कायद्यातल्या पळवाटांचा लाभ घेवून लोकसभेवर निवडून येतात, आपल्याला जनताच निवडून देते, असेही सांगतात. केंद्रातल्या या पूर्वीच्या सरकारमध्ये ते रेल्वे मंत्रीही होते. संसदेत हक्कभंगाचा प्रस्ताव दाखल करायचा इशारा जाहीरपणे दिल्यावरही केजरीवाल मात्र मुळीच मागे हटायला तयार नाहीत. आपण सत्यच बोललो आणि यापुढेही तेच सांगणार, असा आक्रमक पवित्रा घेत त्यांनी संसदेतल्या कलंकित खासदारांच्या चारित्र्याचा पंचनामा केला. काही राज्य सरकारांनी केलेल्या भ्रष्टाचाराची लक्तरेही त्यांनी चव्हाट्यावर टांगली. संसदेत 162 खासदारांवर विविध आरोपाखाली न्यायालयात खटले सुरु आहेत, ही बाब काही लपून राहिलेली नाही ही वस्तुस्थिती आहे. पण, सरसकट सर्वच खासदार कलंकित प्रतिमेचे नाहीत. एक तृतियांश खासदार गुन्हेगारी पार्श्वभूमीचे असले तरीही दोन तृतियांश खासदार स्वच्छ प्रतिमेचे आहेत, हे केजरीवाल यांनाही माहिती आहे. पण, सरसकट त्यांनी सर्वच खासदारांची बदनामी होईल, अशा पध्दतीने केलेले वक्तव्य सवंग लोकप्रियता मिळवणारे असले तरी, ते संसदेचीही बदनामी करणारे ठरते. गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या नेत्यांना निवडणुकीत मतदारांनी पराभूत करावे, लोकशाहीचे शुध्दिकरण करावे, या त्यांच्या आवाहनाला कुणाचाही आक्षेप असायचे कारण नाही. पण, त्यांनी संतापाच्या भरात संसदेवरच तोफ डागून, सार्वभौम मतदारांचाही अवमान केला, ही बाबही लोकशाहीला मारक ठरते. साप साप म्हणून भुई धोपटण्यापेक्षा फक्त सत्याचाच आधार घेत लोकजागृतीसाठी त्यांनी प्रचार मोहीम राबवायला हवी. त्यांच्या या चिथावणीखोर आणि आगलाव्या वक्तव्याने नवा राजकीय संघर्ष सुरु होईल आणि त्यांचा लोकशाहीच्या शुध्दिकरणाचा मूळ हेतूच बाजूला पडेल, याचे भान त्यांना राहिलेले नाही. या असल्या आरोपांनी सरकार आणि राजकीय पक्षावर फारसा परिणाम होणार नाही. कॉंग्रेस, भारतीय जनता पक्षासह बहुतांश राजकीय पक्ष लोकशाहीची गुन्हेगारी राजकारणापासून मुक्तता झाली पाहिजे, अशी भाषणे जाहीर प्रचारसभात करीत असले तरी, त्यांचे खायचे दात वेगळेच आहेत. सत्तेच्या राजकारणात गुरफटलेल्या या पक्षांना लोकशाहीचे शुध्दिकरण करायसाठी, लोकप्रतिनिधी कायद्यात बदल घडवायची हिंमत होत नाही. राजकारण्यांना अंगावर घेण्यापेक्षा बिरबलाच्या धूर्त धोरणाचा स्वीकार करून, पोपट मेल्याचे त्यांनी दुसऱ्या पध्दतीने सांगायला हवे होते.
http://www.dainikaikya.com/20120228/4805588877376365661.htm

स्टिकचा तडाखा


भारतीय हॉकी संघाचा पुनर्जन्मच झाला आहे; परंतु लंडन ऑलिंपिकमध्ये खेळायला मिळतेय, एवढ्यावर समाधान मानून चालणार नाही, तर "सोने' लुटूनच परत यायला हवे. 

ऑस्ट्रेलियात सिडनीमध्ये झालेल्या एकदिवसीय क्रिकेट सामन्यात भारतीय संघाने सपाटून मार खाल्ला, त्याच दिवशी इकडे नवी दिल्लीत फ्रान्सचा दणदणीत पराभव करून भारतीय हॉकी संघाने आपली लंडनवारी निश्‍चित केली आहे! कोणे एके काळी हॉकीचे अनभिषिक्‍त सम्राट म्हणून भारताचा जगभरात वावर होता. ऑलिंपिकमध्ये एकदा दोनदा नव्हे, तर आठ वेळा सुवर्णपदक जिंकण्याचा मान हॉकीपटूंनी आपल्याला मिळवून दिला होता. पण, बघता बघता दिवस पालटले. गोऱ्या टोपीकरांनी भारतात आणलेल्या चेंडूफळीच्या खेळातून सोन्याचा धूर निघतोय, हे क्रीडा क्षेत्रात धुमाकूळ घालणाऱ्या राजकारण्यांच्या लक्षात आले. त्यांनी पुकारलेल्या खेळाडूंच्या लिलावात दिग्गज विक्रमवीरही सामील झाले आणि "राष्ट्रीय खेळ' म्हणून कागदोपत्री नोंद असलेल्या हॉकीला कवडीइतकी किंमत उरली नाही. त्याचीच परिणती बीजिंग ऑलिंपिकसाठी पात्रता फेरीत खेळायला लागण्यात झाली आणि तेथेही पदरी पराभवच आला. गेली आठ वर्षे भारतातील इनेगिने हॉकीप्रेमी भारत ऑलिंपिकमध्ये पुन्हा कधी खेळेल, यासाठी देव पाण्यात घालून बसले होते. त्यांच्या आशा-आकांक्षांची पूर्ती अखेर झाली आहे आणि आता भारतीय हॉकी संघ लंडन ऑलिंपिकमध्ये दिमाखाने सहभागी होणार आहे. हा एका अर्थाने भारतीय हॉकी संघाचा पुनर्जन्मच असला, तरी पुनरुत्थानाची ही लाट भारताच्या सीमारेषा ओलांडून सातासमुद्रापलीकडे जायला हवी. केवळ लंडन ऑलिंपिकमध्ये खेळायला मिळतेय, एवढ्यावरच समाधान मानून चालणार नाही, तर भारतात क्रिकेटची स्थापना करणाऱ्या त्या टोपीकराच्या मायभूमीतून "सोने' लुटूनच आपल्या संघाने परत यायला हवे, तरच क्रिकेटच्या मागे वेड्यासारखे धावणाऱ्या भारतीयांच्या डोळ्यांत झणझणीत अंजन घातले जाईल. अर्थात, या पात्रता फेरीत भारतीय हॉकी संघ ज्या तडफेने आणि जिद्दीने खेळला, ते बघता आठ वर्षांतील मानहानीचा बदला हा संघ लंडनमध्ये निश्‍चितच घेईल, असे खात्रीने म्हणता येते. त्यातही आपल्या हातावर पाच खंडांचे प्रतीक असलेली चक्राची मुद्रा गोंदवून ठेवणाऱ्या संदीपसिंहाचा सर्वार्थाने "सिंहा'चा वाटा आहे. या पात्रता फेरीतील सहा सामन्यांत भारताने नोंदवलेल्या 44 पैकी 16 गोल एकट्या संदीपच्या नावावर आहेत, हे लक्षात घेतले की त्याच्या कामगिरीचे मोल लक्षात येते. अंतिम सामन्यात भारताने फ्रान्सचा 8-1 असा धुव्वा उडवला, त्यातही संदीपचा वाटा एका हॅटट्रिकसह पाच गोलांचा होता. त्यामुळेच संदीपसह संपूर्ण भारतीय संघावर आज भारतवर्षांतून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. पण, ऑस्ट्रेलियात भारतीय क्रिकेट संघ सुमारे वर्षभरापूर्वीच्या "वर्ल्ड कप'च्या बिरुदाला जागून खेळला असता आणि विजयश्रीने आपल्यावर वरदहस्त ठेवला असता, तर हॉकीपटूंच्या या देदीप्यमान यशाकडे आपल्या साऱ्यांचे कितपत लक्ष गेले असते, ते सांगता येणे कठीण आहे आणि अवघ्या भारतीय क्रीडाक्षेत्राच्या शोकांतिकेचे इंगितही हेच आहे. 

भारतीयांचे क्रिकेटवेड गेल्या काही वर्षांत इतके टोकाला गेले आहे, की त्यापायी हा देश "वन गेम नेशन' आहे की काय, अशी शंका घ्यायला जागा निर्माण व्हावी. हे वेड लक्षात घेऊनच केवळ दोन घटका करमणुकीसाठी "आयपीएल'ची सर्कस उभी करण्यात आली. त्यातून क्रिकेटपटू कोट्यवधीचे धनी होऊ लागले; पण देशाची प्रतिष्ठा पणास लावून भारताला लंडन ऑलिंपिकमध्ये सहभागी होण्याचा मान मिळवून देणाऱ्या खेळाडूंना सरकारने जाहीर केलेली इनामाची रक्‍कम आहे, मात्र प्रत्येकी अवघी एक लाख! आपला देश कोणत्या खेळाला काय किंमत देतो, तेच यातून स्पष्ट होत असले तरी त्यातून धडा घ्यायला मात्र कोणीच तयार नाही. जगभरातील हाताच्या बोटावर मोजता येतील, इतकेच देश क्रिकेट खेळतात, तरी त्याचे कौतुक मोठे आणि त्याला मिळणारे पुरस्कर्तेही धनदांडगे! त्यामुळेच अवघ्या काही वर्षांपूर्वीपर्यंत इतर प्रगतच नव्हे, तर भारताच्या तुलनेत मागास असलेले देशही ऑलिंपिक वा राष्ट्रकुल स्पर्धेत पदकांचे शतक ठोकत असताना, आपल्या संघाच्या गळ्यातील पदके मात्र दोन आकडी संख्याही गाठत नसत. त्यातल्या त्यात बरा खेळ भारतीय संघाने दोन वर्षांपूर्वी दिल्लीत झालेल्या राष्ट्रकुल स्पर्धांमध्ये केला खरा; पण तेथेही सर्वात मोठा "विक्रम' सुरेश कलमाडी यांच्याच नावावर लागला! -आणि इंडियन हॉकी फेडरेशन आणि हॉकी इंडिया या दोन संघटनांमधील वादापोटी इंटरनॅशनल हॉकी फेडरेशनने इंडियन हॉकी संघटनेची मान्यताच रद्द केली होती. शिवाय, आपले मानधन वाढवून मिळावे म्हणून हॉकीपटूंना आंदोलन करावे लागल्याची गोष्टही ताजीच आहे. पण, अशी ही सारी अडथळ्यांची शर्यत ओलांडून भारतीय हॉकीपटूंनी मोठ्या दिमाखात लंडनवारीचे तिकीट बुक केले आहे. त्याबद्दल त्यांचे पुनःश्‍च अभिनंदन आणि लंडनमध्ये आणखी मोठे मानसन्मान मिळावेत, अशा शुभेच्छा! 
http://www.esakal.com/esakal/20120228/5450465627713046676.htm

यांची डोकी तपासा!


केजरीवाल यांनी संसदेवर थुंकण्याचा प्रयत्न केला. अफझल गुरूने केलेला हल्ला व या लोकांनी केलेला हल्ला तितकाच धोकादायक आहे.
यांची डोकी तपासा!हिंदुस्थान नामक आमच्या देशात सध्या कुणाचाच पायपोस कुणाच्याच गळ्यात नाही असेच एकंदरीत वातावरण आहे. एका महान देशाला नैतिकतेच्या र्‍हासाने ग्रासून टाकले आहे. स्वातंत्र्य, मग ते बोलण्याचे असेल नाही तर वागण्याचे, त्या स्वातंत्र्याचा नुसता स्वैराचार सुरू आहे. आताही अरविंद केजरीवाल नामक एका ‘एनजीओ’वाल्याने हिंदुस्थानच्या संसदेविषयी अत्यंत बकवास उद्गार काढले आहेत. ‘संसदेत बलात्कारी व खुनी गुन्हेगारांचा भरणा असल्याचे सांगून संसद हीच देशापुढील मोठी समस्या आहे, असे म्हटले आहे. केजरीवाल यांच्यासारख्या बिनबुडाच्या लोकांनी असे बोलणे व अण्णा महाराजांनी त्याचे समर्थन करणे म्हणजे त्यांच्या तथाकथित चळवळीचा बोर्‍या वाजल्यातच जमा आहे. एका विचारवंताने असे म्हटले आहे की, ‘ज्या माणसाच्या पोटात अल्सर झालेला असतो, त्याला पोटाशिवाय दुसरे काहीच सुचत नाही!’ अण्णा उत्सव मंडळाचेही तेच झाले आहे. अण्णा व त्यांच्या तथाकथित आंदोलनातील फोलपणा उघड झाल्यामुळे लोकांनीच त्यांच्याकडे पाठ फिरवली. भ्रष्टाचाराविरोधात रस्त्यावर उतरायला हवे. त्यात आक्षेपार्ह काहीच नाही. वेळोवेळी ही अशी आंदोलने होतच असतात. मात्र याचा अर्थ मैदानावर बसून टी.व्ही. कॅमेर्‍यासमोर कुणाचीही, कशीही यथेच्छ बदनामी करणे असा नव्हे. सोनिया गांधींचा नुसता उदो उदो करायचा. बाईसाहेब कशा चांगल्या आहेत, बाईसाहेबांना भ्रष्टाचाराचा कसा तिटकारा आहे, बाईसाहेबांनी मनावर घेतले तर भ्रष्टाचाराचे कसे निर्दालन होईल, अशी चापलुसी करायची व त्याच वेळी कॉंग्रेसच्या इतर दोन-चार लोकांवर आरोप करून खळबळ उडवून द्यायची, हे कसले धंदे? उत्तर प्रदेशात कॉंग्रेसचे अस्तित्वच नाही. उत्तर प्रदेशात भ्रष्टाचाराचा हैदोस घातलाय तो तेथील मायावती सरकारने. डझनभर मंत्र्यांना भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली न्यायालये किंवा लोकायुक्तांनी दोषी ठरविले, पण मायावतीच्या राज्यात जाऊन प्रचार करणारे हे अण्णा मंडळ 
मायावतीच्या भ्रष्टाचाराविरुद्ध एक शब्दही उच्चारायला तयार नाही. मात्र संसदेत कसे चोर व दरोडेखोर भरले आहेत त्यावर प्रवचने झोडीत आहेत. अगदी सोनिया गांधींचेच उदाहरण घ्या. हे जे कोणी केजरीवाल नावाचे गृहस्थ आहेत, त्यांनी जनतेला माहितीचा अधिकार मिळावा म्हणून लढा दिला होता असे म्हणतात; पण चेन्नईच्या गोपाळकृष्णन या सामाजिक कार्यकर्त्याने माहितीच्या अधिकाराचा वापर करून सोनिया गांधी यांच्या संपत्तीचा तपशील मागताच खासगी स्वातंत्र्य व सुरक्षेचे कारण देत ही माहिती देण्यास सोनिया गांधींनी नकार दिला. ‘अशी माहिती गोळा करण्यामागे कोणते जनहित दडले आहे?’ असा उलटा सवाल सोनियांनी आयकर विभागाला पाठविलेल्या पत्रात केला आहे. आता यावर टीम अण्णांचे काय म्हणणे आहे? माहितीच्या अधिकाराचा दट्ट्या जसा इतरांना आहे तसा सोनिया गांधींना का नाही? यावर अण्णा किंवा त्यांचे ‘मेंबर’ आवाज चढवून काही बोलतात का? हे लोक ज्यांना बलात्कारी, चोर, दरोडेखोर, गुन्हेगार म्हणतात त्यांनी आपली सर्व माहिती उघड करायची व ज्यांच्या मुठीत देशाची सत्ता व संसदेची सूत्रे आहेत त्यांनी मात्र स्वत:च्या कोंबड्या झाकून ठेवायच्या. यात कुणालाच काही वावगे वाटू नये याचेच आश्‍चर्य वाटते! सोनियांची संपत्ती नेमकी किती आहे? ती देशात आहे की परदेशात आहे? हे एक रहस्यच आहे; पण ‘टीम’ अण्णांच्या दृष्टीने त्या चांगल्या, कामसू, प्रामाणिक असल्याने त्यावर कुणी काही बोलायचे नाही. अण्णा हजारे व त्यांच्या मंडळींनी कुणावर काहीही बोलावे, चिखलफेक करावी व समाजातील एका विशिष्ट वर्गाने त्याचे समर्थन करावे, ही बाब गंभीर आहे. बरं संसदेत खुनी, गुन्हेगारांचा भरणा आहे असे केजरीवाल कुठल्या तोंडाने म्हणू शकतात. आधी या 
अण्णा मंडळाने स्वत:खाली काय जळते आहे ते पाहावे. अण्णा मंडळाच्या एक सदस्या किरण बेदी यांच्याविरुद्ध ‘चारसो बिसी’ केल्याचा गुन्हा न्यायालयाच्याच आदेशानुसार दाखल करण्यात आला आहे. खुद्द केजरीवाल महाशयांवरही आयकर बुडविल्याचा आरोप आहेच. दुसरे ते शांतीभूषण. त्यांनादेखील स्टॅम्प ड्युटी चुकविल्याबद्दल २७ लाख रुपये दंड ठोठावण्यात आला आहे. शांतीभूषण यांचे पुत्र आणि अण्णा मंडळाचे सदस्य प्रशांत भूषण यांनीही कश्मीरप्रश्‍नी सार्वमत घ्यावे अशी राष्ट्रद्रोही मुक्ताफळे उधळली होती. आता केजरीवाल यांनी संसदेवर थुंकण्याचा प्रयत्न केला. अफझल गुरूने संसदेवर केलेला हल्ला व या बहकलेल्या लोकांनी केलेला हल्ला तितकाच धोकादायक आहे. संसदेसारख्या संस्था मोडून-तोडून निष्प्रभ करायच्या हे राष्ट्रविरोधी कटकारस्थान असू शकते. परदेशी शक्ती फक्त अफझल गुरूसारखे, कसाबसारखे अतिरेकी पाठवूनच देशावर हल्ला करतात असे नव्हे, तर आमच्याच देशातील चळवळे पकडून त्यांना ‘डॉलर्स’रूपी खंडण्या देऊन देशाचे स्तंभ उद्ध्वस्त करण्याचे काम राजरोस सुरू आहे. संसदेच्या बाबतीत एक पावित्र्य जपलेच पाहिजे. त्यात काही त्रुटी किंवा मतभेद असू शकतील. पण कुणीही उठावे व संसदेस गुंड, बलात्कारी, खुन्यांचा अड्डा म्हणावे हे देशहिताचे नाही. पुन्हा स्वत:स गांधीवादी म्हणवून घेणारे लोकही अशा बेफाम वक्तव्याचे समर्थन करतात तेव्हा नवलच वाटते. राजकारणात टीका-टिपणी होतच असते. मात्र ती कुणी कुणावर करावी? पुन्हा ते करताना डोके ठिकाणावरही हवेच. केजरीवाल आणि कंपनी ज्या पद्धतीने संसदेसंदर्भात बरळत आहे, त्यावरून यांची डोकी तपासा, असेच सांगण्याची वेळ आली आहे. जे पाकिस्तान किंवा अमेरिकेला हवे आहे तेच हिंदुस्थानात घडताना दिसत आहे. पाकिस्तानातील अतिरेक्यांकडे शस्त्रे व स्फोटके आहेत. हिंसाचार व दहशतवाद आहे. हिंदुस्थानातील नवे अतिरेकी पांढरपेशे, शिकले सवरलेले व हाती शस्त्र न घेता लोकांच्या मनात देशविरोधी विष पेरणारे आहेत. हा प्रकार सशस्त्र दहशतवादापेक्षा भयंकर आहे.
http://www.saamana.com/

मराठीचा दिवा..


माझ्या मराठी मातीचा। लावा ललाटास टिळा।। हिच्या संगाने जागल्या। दर्‍याखोर्‍यातील शिळा।। अशी भूमिका घेऊन कविभास्कराच्या सार्मथ्याने मराठी जग उजळून ठेवणार्‍या कुसुमाग्रजांच्या जन्मदिनी ‘मराठी दिन’ साजरा केला. आज तात्यासाहेब शरीराने नाहीत. सूर्य जरी मावळला, तरी नाहीसा होत नसतो. सूर्य असतोच; पण आपल्या नजरेला तो दिसतो की नाही, हे महत्त्वाचे असते. जीवनाचे आणि मराठी भाषेचे समग्र भान ज्यांनी आयुष्यभर निष्ठेने मांडले आणि भाषेची जमीन कसदार केली त्यांचे स्मरण करीत असताना या महाराष्ट्रात मराठी बोलणार्‍यांचा सलग भूभाग कमी होत आहे. सिंधी भाषा अनेक ठिकाणी बोलली जाते; परंतु या भाषकांना सलग भूभाग नाही. त्यामुळे या भाषेचा विकास र्मयादित झाला. हिब्रूचे पुनरुज्जीवन कसे करावे लागले, हे जगाला माहीत आहे. आजच्या महाराष्ट्राचा विचार करता, या राज्याची सार्वजनिक जीवनाची भाषा कोणती, असाच प्रश्न पडतो. मराठीचे भवितव्य उज्ज्वल आहे, अशी अस्मिताखोर भाषा करायची किंवा मराठी मरत चालली आहे, असे शोकांतिक निदान करायचे हे बरोबर आहे का? या दोन टोकांच्या मध्ये काय अवस्था आहे? ‘सचिन तेंडुलकरने ९९ शतके ठोकून इतिहास घडविला..आणि इतिहास रचला..’ अशी दोन्ही वाक्ये मराठीत लिहिली जातात. यांतील रचणे हिंदीतून आलेले आहे. आपल्याकडे मराठी संस्कृतीत शब्दापासून प्रत्येक गोष्ट घडविण्यावर भर असतो. जे आधीच अस्तित्वात आहे त्याची मांडणी करणे, याला मराठीत रचना म्हणतात. मराठीत शब्दांना सांस्कृतिक संदर्भ असतात. परभाषेतील शब्द वापरणे किंवा आत्मसात करणे, ही गोष्ट मराठीला नवी नाही. नाथांच्या काळात एका बाजूने फारसी भाषेचा दबाव आणि संस्कृतचा दुराग्रह, या कात्रीत मराठी भाषा सापडलेली असताना बहुजनांच्या भाषेत त्यांनी भारुडे लिहिली. आजही ती समकालीन वाटतात. आज आपण परभाषेतील शब्द घेताना किंवा वापरताना मराठी सांस्कृतिक संदर्भ असलेले शब्द वगळून उसनवारी करतो. विदर्भात सार्वजनिक ठिकाणी सरसकट हिंदी बोलली जाते त्याला गतकाळाचे संदर्भ आहेत. मराठवाड्यात निजामाची राजवट होती; त्यामुळे ऊदरूचा प्रभाव होता. परंतु, आजकाल सातारा-सांगली-कोल्हापूर आणि काही प्रमाणात कोकण वगळता कोणत्या गावामध्ये सलग, सोपी, सुंदर, कसदार मराठी बोलली जाते? पुण्याच्या औद्योगिकीकरणाच्या वादळाने ‘हिंग्लिश’पासून हिंदीपर्यंत भाषा सुसाट धावत असते. मुंबईत तर ‘बम्बय्या मराठी’ भूषण मानले जाते. आजही महाराष्ट्राच्या खेडोपाडी उत्तम मराठी बोलली जाते; परंतु सरकारपासून माध्यमांपर्यंत भाषेची जी मोडतोड सुरू असते, त्यामुळे आपल्या अस्तित्वाच्या सीमारेषा विसकटू लागल्या आहेत. प्रेक्षकांना उद्देशून व्यासपीठावर ‘दर्शक’ असा शब्द वापरला जातो. दूरचित्रवाहिन्यादेखील अनेकदा हा शब्द वापरतात. मुळात प्रेक्षक आणि श्रोता यांत फरक असतो. आपण ‘सूक्ष्मदर्शक यंत्र’, ‘निदर्शक’ असे शब्द ऐकतो. सूक्ष्मपणे दाखविणारे यंत्र, असा अर्थ लावतो. एखाद्या भूमिकेचे निदर्शक विधान, असे वाक्य वापरतो. येथे दर्शक असा शब्द आलेला आहे. प्रेक्षकांना जर दर्शक म्हणायचे, तर त्यात मराठी संस्कृतीचा संदर्भ काय? न्यायव्यवस्थेत शेतकर्‍यांना समजेल अशा भाषेत व्यवहार आज तरी होतो का? सरकारी पत्रकांची भाषा सरकारी कर्मचार्‍यांना तरी कळते का? मग, मराठीला ज्ञानभाषा बनविण्याच्या कामाचे काय होणार? शालांत परीक्षेपर्यंत एके काळी बरीच परिभाषा आपण वापरत होतो. आज मुला-मुलींना हिंदी किंवा इंग्रजी या भाषांत व्यवहार करण्याची सवय लागली, तर पत्रकारितेपासून वाड्मयापर्यंत आपला प्रवास कसा होणार? मराठी फक्त कुटुंबात बोलण्याचीच भाषा राहणार काय? अर्थात, असे घडण्यासाठी अनेक शतके जावी लागतील. कारण संस्कृत देवांनी निर्माण केली असली, तरीही प्राकृत काही चोरांनी निर्माण केलेली भाषा नव्हे, असे नाथांनी सांगितले त्याला आजही अर्थ आहे. १९४0नंतर मराठी वृत्तपत्रांनी क्रिकेटच्या खेळाची परिभाषा मराठी भाषकांना समजेल, अशी तयार केली. गोलंदाज, फलंदाज, यष्टिचीत, चौकार, षट्कार, धावबाद असे शब्द लोकप्रिय केले. आज मराठीतसुद्धा शीर्षक देताना ‘छक्का’ असे लिहिले जाते. याचा अर्थ, ‘शब्दचि आमुचे जीवन’ या तुकोबांच्या सार्मथ्याचा प्रभाव बाजूला टाकण्याचा पद्धतशीर प्रयत्न येथे रूढ होत चालला आहे. तरीही, मराठीचे भवितव्य किती उज्ज्वल आहे, असे ढोल वाजविले जातात. राजवाडेंनी मराठी मुमुर्षू झाली, असे म्हटल्यामुळे मराठी नष्ट झाली नाही हे खरे असले, तरीही रोजच्या व्यवहारात होणारी भाषेची तोडफोड आपल्यालाच थांबवावी लागेल. ‘माहोल’ आणि ‘वातावरण’या दोन शब्दांत काही सांस्कृतिक संदर्भ आहेत की नाही? केवळ रूढ झाले आहे म्हणून वापरतो, या भूमिकेने भाषेचा विकास होतो का? संगीतात ‘साथ करणे’ आणि ‘संगत करणे’ यांत काही फरक आहे की नाही? नव्या पिढीने मराठी अस्मिता जागवावी आणि कुसुमाग्रजांचे सार्मथ्य लक्षात घ्यावे असे वाटत असेल, तर आपण जी दिशा स्वीकारली आहे त्याबद्दल आत्मपरीक्षण करणार की नाही? यात प्रमाण भाषा किंवा व्याकरण यांचे प्रश्न नंतरच्या टप्प्यावर येतात. बोली भाषादेखील इथल्या मातीचा वास घेऊन वाढत असताना शब्दांचे आक्रमण सहजासहजी स्वीकारणार्‍या समाजाचे स्वातंत्र्य आपोआप टिकेल काय? महाराष्ट्राच्या विधिमंडळानेदेखील कित्येक चांगले मराठी शब्द निर्माण केले आणि त्यांचा वापर सुरू केला; परंतु आज विधिमंडळात जी भाषणे होतात, त्यांत मराठीचे भाषापण किती असते? जीवनाच्या सर्व क्षेत्रांत भाषेची अवहेलना होत असेल आणि भाषेच्या अस्मितेची प्रतीके मिरविली जात असतील, तर आपली दिशा तपासली पाहिजे. गोदेच्या काठावर उगवताना दिसलेला शुक्राचा तारा म्हणजे आत्मार्पण करण्यासाठी निघालेला वीर आहे, असे कुसुमाग्रजांना वाटत असे. साहित्याच्या अनेक दालना्त त्यांनी लेखन केले असले, तरीही त्यांच्या लेखनाच्या केंद्रस्थानी कविताच होती. त्यांच्या कवितेला नैतिक मूल्यांचा संदर्भ होता. सीमेवर लढणार्‍या जवानांमध्ये त्यांना ‘संस्कृतीचा निळा चांदवा’ दिसत असे. प्र™ोची जाणीव मान्य करण्याचा धर्म त्यांनी आयुष्यभर जोपासला. त्यांच्या प्रत्येक शब्दाला मराठीच्या आकाशाचा स्पर्श झालेला असे. कोणत्याही मराठी माणसाला 
आयुष्य कळावे, यासाठी तात्यासाहेब लिहायचे. ‘अखेर माझे जीवन म्हणजे, माझे कळणे। तिमिरही माझा, दिवाही माझा..माझे जळणे’ या शब्दांचा मराठी तत्त्वस्पर्श सर्वांनी नीट ध्यानात 
घेतला पाहिजे. 
http://onlinenews1.lokmat.com/php/detailednews.php?id=EditorialEdition-16-1-27-02-2012-2c0b6&ndate=2012-02-28&editionname=editorial

'भारतीय विज्ञाना'कडे जागतिक नेतृत्व : स्वप्न की वास्तव?


भारतीय विज्ञान दिनानिमित्त आज, 'महाराष्ट्र टाइम्स'चा हा विशेष अंक प्रसिद्ध होत असून 'मटा'च्या या स्तुत्य पुढाकाराबद्दल मी शुभेच्छा देऊ इच्छितो. या अंकासाठी संपादकपद भूषवणे हा माझ्यासाठी सन्माननीय क्षण आहे. आता विज्ञान दिनाकडे वळूया. भारतीय विज्ञान आणि तंत्रज्ञानाने कुठेपर्यंत विकास साधला आहे, हे पाहणे उद्बोधक ठरेल. 

सन २००३मध्ये ज्येष्ठ खगोल शास्त्रज्ञ जयंत नारळीकर यांचे 'दी सायंटिफिक एज' हे पुस्तक प्रकाशित झाले. त्यात विसाव्या शतकातील भारतीय विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या दहा प्रमुख यशोगाथा आहेत. सन १९५० पूर्वीच्या पाच आणि उर्वरित पाच त्यानंतरच्या वर्षांतील. १९५०पूर्वीच्या यशोगाथा या वैयक्तिक प्रयत्नातून साध्य झाल्या आहेत. रामानुजन (या गणितज्ज्ञाच्या उत्तुंग कामावर अजूनही संशोधन होते), मेघनाद साहा (यांच्या खगोलभौतिकशास्त्रातील आयनीभवनाच्या समीकरणाच्या शोधाने या क्षेत्रात क्रांती घडवली), सत्येंद्र नाथ अर्थात एस.एन. बोस (यांनी अणुगर्भातील सूक्ष्म कणांबाबत संख्याशास्त्रीय सिद्धांत मांडला), सी.व्ही. रामन (भारतात राहून संशोधन करणाऱ्या भारतीय शास्त्रज्ञाला मिळालेला एकमेव नोबेल पुरस्कार. 'रामन इफेक्ट' या शोधासाठी तो मिळाला) आणि जी. एन. रामचंदन (हे रेण्वीय भौतिकशास्त्राचे जनक) या त्या यशोगाथा. 

नारळीकरांनी सन १९५०नंतरच्या पाच यशोगाथांमध्ये हरितक्रांती, अंतराळ संशोधन, अणुऊर्जा, अतिवाहकता आणि नव्वदच्या दशकात विज्ञान आणि औद्योगिक संशोधन संस्थेचा कायापालट (त्या काळात या संस्थेचा मी महासंचालक होतो) यांचा समावेश केला आहे. यात, अतिवाहकतेमधील संशोधन हे सी.एन.आर. राव यांच्या मोलाच्या योगदानातून झाले. हा अपवाद वगळता अन्य यशोगाथा सरकारी निधींवर झालेले संघटित स्वरूपाचे कार्य होते. रामानुजन, रामन, बोस यांच्यासारख्या शास्त्रज्ञांनी केलेले अलौकिक कार्य विसाव्या शतकाच्या उत्तरार्धात का साधता आले नाही? असा प्रश्न पडतो. परंतु, भावी रामन आणि रामानुजन आजही कुठेतरी असतील. आपण त्यांना शोधले पाहिजे आणि त्यांना विज्ञान संशोधनासाठी उत्तेजन दिले पाहिजे. 

सन २००५मध्ये भौतिकशास्त्राचे नोबेल ग्लोबर, हॉल आणि हान्श या तिघांना विभागून देण्यात आले. भारतीय वंशाचे शास्त्रज्ञ ई.सी.जी. सुदर्शन यांनाही त्यात सामावून घ्यायला हवे होते, असे भारतीय शास्त्रज्ञांचे म्हणणे होते. पण, सन २००९मध्ये भारतीय वंशाचे शास्त्रज्ञ वेंकटरामन रामकृष्णन यांना रसायनशास्त्राचे नोबेल स्टित्झ आणि योनाथ या दोघांच्या जोडीने विभागून देण्यात आले. आता, भारतात संशोधन करणाऱ्या भारतीय शास्त्रज्ञाला नोबेल कधी मिळेल, अशी उत्सुकता वाटणे साहजिकच आहे. माझ्या अंदाजानुसार, ही वेळ फार दूर नाही. 

भारतीय विज्ञानक्षेत्र पुन्हा वैभवाकडे निघाले असल्याचे दिसले तरी आपल्याला अत्यंत अस्वस्थ करणाऱ्या विरोधाभासालाही सामोरे जावे लागत आहे. 'चांदयान-१' या भारताच्या चांदमोहिमेमुळे चंदावरील पाण्याचा शोध लागला; पण, आजही भारताच्या ग्रामीण भागातील महिलांना पाण्यासाठी कित्येक किलोमीटरची पायपीट करावी लागते, हे वास्तव आहे. हे पाहता, विज्ञानक्षेत्रातील विकास आणि संशोधनाचा सर्व समाजासाठी उपयोग होण्याच्या दृष्टीने आपण प्रयत्नशील राहायला हवे. हे आव्हान भारतीय तरुण शास्त्रज्ञ स्वीकारतील का? याचे उत्तर ठामपणे 'होय' असेच आहे! 

भारतीय वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन समितीने सन २००८मध्ये नवीन औषधे शोधून ती विकसित करण्याचे आव्हान स्वीकारले. यामध्ये आतापर्यंत तीन हजार पदवीधर विद्यार्थी सहभागी झाले आहेत. क्षयरोगावरील प्रभावी उपचारास आवश्यक असणाऱ्या नव्या औषधाच्या निमिर्तीसाठी कृत्रिम नवे संयुग तयार करण्याच्या प्रक्रियेपर्यंत त्यांनी यश मिळवले आहे. 'टेकपेडिया'ने पदवी घेत असलेल्या विद्यार्थ्यांचे एक लाख प्रकल्प संकेतस्थळावर टाकले आहेत. 

बहुतांश प्रकल्प सामाजिक समस्या मांडणारे आणि ते सोडवण्यासाठी अधीर होऊन प्रयत्न करणारे आहेत... विदर्भातील तरुण शास्त्रज्ञांनी मला एकच गोष्ट विचारली, शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबवण्यासाठी विज्ञान काय करू शकते? त्यांच्या प्रश्नाचा अर्थच असा की, आपल्याकडे संशोधनासाठी झोकून देण्याची तयारी असलेल्या अत्यंत संवेदनशील तरुण शास्त्रज्ञांचा समूह आहे! आपण निमिर्तीक्षम प्रज्ञावान तरुणांना विज्ञानाकडे वळवू शकलो, त्यांना संशोधनातील अव्वल दर्जाचे काम करण्याची संधी दिली तर आपण विज्ञानातील गतवैभव पुन्हा मिळवू शकतो. भारताला वैज्ञानिक प्रगत देशांच्या रांगेत सर्वोच्च स्थानावर नेऊन बसवू शकतो, याची मला पूर्ण खात्री आहे. 

रघुनाथ माशेलकर 
(गेस्ट एडिटर)
http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/12063145.cms

शिमग्याचे सोंग


भ्रष्टाचाररूपी रावणाचा वध करण्यासाठी प्रभू रामचंद्राने अण्णा हजारे यांचा अवतार घेतला आहे आणि अरविंद केजरीवाल, किरण बेदी हे त्यांचे हनुमान आहेत, असा जो काही समज पसरविला जात होता, तो किती वरवरचा आहे हे गेल्या काही दिवसांत अनेकदा दिसले. आता तर ही सारी मंडळी स्वत:च्या शेपटीला लागलेली आग विझवण्याच्या नादात वाटेल तशी उडय़ा मारू लागली आहेत आणि भ्रष्टाचारविरोधी लढय़ातील वानरसेना होण्याऐवजी प्रत्यक्ष वानरचाळे करू लागली आहेत. याचे ताजे उदाहरण म्हणजे अरविंद केजरीवाल यांचे नवे वक्तव्य. भारतीय संसद ही बलात्कारी, गुंड वगैरेंनी भरलेली असल्याचे विधान केजरीवाल यांनी केले आहे. त्यांच्या आतापर्यंतच्या बेजबाबदार वर्तनास ते शोभेसेच असले तरी आतापर्यंतच्या एकूण बेजबाबदारीची मर्यादा त्यांनी यातून ओलांडली आहे. केजरीवाल आणि मंडळींचा आपण शुद्ध आहोत असा दावा असतो. प्रचलित बाजारपेठीय विक्रय तंत्रात आपले उत्पादन चांगले ठरवण्यासाठी स्पर्धकाच्या उत्पादनास नावे ठेवावी लागतात. केजरीवाल यांचे वर्तन त्याचप्रमाणे झाले. आपण स्वच्छ आहोत हे सांगण्यासाठी त्यांना इतरांना अस्वच्छ ठरवावे लागत आहे, यातच सगळे आले. भ्रष्टाचाराच्या निर्मूलनासाठी केजरीवाल आणि मंडळी एक संस्था चालवितात. कोणतीही मोहीम चालवायची तर पैसा लागतो. तसा तो या मोहिमेसाठीही लागत असणार. आपण या पैशाचा हिशेब देतो, असे ते सांगत असतात. त्या हिशेबावरून केजरीवाल यांना मध्यंतरी टीका सहन करावी लागली होती. खेरीज केंद्रीय सेवेत असताना ते शिष्यवृत्ती मिळाल्यावर सेवेतून दूर झाले. त्या वेळी सेवेच्या करारानुसार ते सरकारचे काही देणे लागत होते. सरकारने नोटीस बजावल्यानंतरच त्यांनी ते पैसे सरकारला परत केले. हे त्यांच्या प्रामाणिकपणाच्या व्याख्येत बसत असावे. जसे केजरीवाल तशाच त्यांच्या साथीदार. या बेदीबाईंनी पोलीस सेवेत असताना तुरुंग सुधारणा जोमाने राबविल्या आणि त्याचे दामदुप्पट फळ त्यांना मिळाले. परंतु सेवेनंतरही त्या फळावर त्या संतुष्ट नसून त्यांची अधिकाची हाव संपलेली नाही. पोलीस अधिकारी म्हणून त्यांनी जे काम केले त्या अनुभवकथनासाठी त्यांना ठिकठिकाणांहून व्याख्यानांची निमंत्रणे येत असतात. थोडय़ा वेळात खूप समाजसेवा करायची असल्याने बेदीबाई विमानाने हिंडतात. त्यातही त्यांचा काटकसरी दृष्टिकोन लक्षात घेण्यासारखा आहे. त्या प्रथम वर्गाचे भाडे संस्थेस आकारतात आणि प्रवास मात्र जनता वर्गातून करतात. यातून जे पैसे वाचतात ते त्या समाजसेवेसाठी वापरतात. केवढे उदात्त विचार. वास्तविक त्यांनी अधिक साधेपणा दाखवला तर अधिक पैसे उभे राहू शकतात. बडे उद्योगपती, व्यापारी, राजकारणी वगैरे मंडळी जशी स्वत:च्या खासगी विमानाने प्रवास करीत असतात त्याचप्रमाणे बेदीबाईंनी त्यांना निमंत्रण देणाऱ्या संस्थांना अशा खासगी विमानाचे भाडे आकारावे आणि प्रत्यक्ष प्रवास जनता वर्गातून करावा. असे केल्याने त्यांचे अधिक पैसे वाचतील आणि तितके अधिक पैसे जनसेवेसाठी त्यांना मिळतील. या दोघांचे ज्येष्ठ सहकारी भूषण पितापुत्रही तसे समाजसेवेत मागे हटणारे नाहीत. उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्री, देशातील आघाडीच्या समाजसेविका सुo्री मायावती यांच्याकडून या भूषण पितापुत्रांनी अत्यंत स्वस्तात मोठी जमीन घेतल्याचे प्रकरण मध्यंतरी बरेच गाजले. त्यावर या कायदेतज्ज्ञ जोडगोळीचे म्हणणे असे की या भूखंड खरेदीत सवलत द्यावी अशी काही मागणी त्यांनी केली नव्हती, परंतु तरीही सुo्री मायावतींनी सवलत दिल्यास त्या बापुडय़ांचा काय दोष? खरेच आहे ते. या दोघांच्या कार्याचा अफाट विस्तार लक्षात घेता भ्रष्टाचाराचे निर्मूलन झाल्यावर श्रमपरिहार करता यावा म्हणून आराम करायचा तर त्यांना मोठे घर लागणार. मोठय़ा घरासाठी जमीनही मोठी हवी. ती मोठय़ा सवलतीत दिली तर त्यावर एवढा मोठा गहजब करण्यासारखे वास्तविक काहीच नाही. ज्या संसदेत बलात्कारी, गुंड वगैर बसतात त्यांच्या विधानसभेतील सहकाऱ्यांनी केजरीवाल यांच्या सहकाऱ्यांना सवलत दिली, तेव्हा त्यांनी ती स्वीकारू नये असा काही सल्ला भूषण पितापुत्रांना केजरीवाल यांनी दिल्याचे ऐकिवात नाही. तसा तो दिला असता भूषणांनी हे भूषणावह कृत्य कदाचित केलेही नसते.
वास्तव हे आहे की गेल्या काही महिन्यांत अण्णा आणि मंडळींच्या आंदोलनाची जी दशा झाली आहे, त्यामुळे या मंडळींचा तोल गेला आहे. त्यामुळे एकापेक्षा एक अतिरेकी विधाने करून आपल्याकडे लक्ष वेधून घेण्याची स्पर्धा या मंडळींत सुरू आहे. केजरीवाल यांच्याही आधी खुद्द अण्णा यांनी अशीच धक्कादायक विधाने करीत संसदेपेक्षा ग्रामसभांना अधिक अधिकार द्यायची मागणी केली होती. या मंडळींची समज आणि वकूब दोन्ही कसे कमी आहेत, याचेच दर्शन यातून घडते. कदाचित असेही असेल की अण्णांचे एकूणच भान ग्राम पंचायत आणि जिल्हा परिषद यांच्या पलीकडे जात नसल्याने त्यांना संसद आदींचे महत्त्व कळले नसावे. अन्यथा अशा तऱ्हेचे बालबुद्धीचे विधान ते करते ना. हे कमी म्हणून की काय त्यांना कपालभातीकार बाबा रामदेव हेही मिळाल्याचे दिसते. त्यांनी केजरीवाल यांच्या ताज्या वक्तव्यास पाठिंबा दिला असून लीबियात कर्नल मुअम्मर गडाफी याची सत्ता उलथून पाडण्यासाठी जसा उठाव झाला तशा उठावाची आपल्याकडे गरज असल्याचे म्हटले आहे. तसा उठाव व्हावा यासाठी आपण काय करणार, हेही त्यांनी स्पष्ट केले असते तर बरे झाले असते. म्हणजे उठाव करायचा जनतेने आणि तो मोडण्यासाठी पोलीस आल्यास बाबा रामदेव यांनी महिलेच्या वेशात पळून जाण्याची अलौकिक योगिक क्रिया करायची, याची पुनरुक्ती होणार का, हे कळले असते. बाबांच्या मतानुसार एक कुटुंब आणि एक पक्ष देशाच्या दुरवस्थेस जबाबदार आहे. त्यांचा रोख गांधी कुटुंबीय आणि काँग्रेस पक्षावर असावा. असे असेल तर बाबांचे हिंदुत्ववादी पक्ष ही दुरवस्था रोखण्यासाठी काय करीत आहेत, या प्रश्नाचे उत्तर त्यांनी द्यावे. देशातील अर्धा डझनपेक्षा अधिक राज्यांत बाबांना देशास अधोगतीकडे नेणाऱ्या पक्षांच्या सत्ता नाहीत. तेव्हा त्या राज्यांत रामराज्य असल्याचे प्रमाणपत्र बाबा आणि अण्णा यांनी द्यायला हरकत नाही.
या मंडळींचे गेल्या काही दिवसांतील वागणे उबग आणणारे आहे. यांच्या या अशा वागण्या आणि बोलण्याने सुरुवातीला भ्रष्टाचारविरोधी मोहिमेस जो आधार मिळाला होता तो आता झपाटय़ाने विरू लागला आहे. याचे कारण आपल्यासारख्या देशास कर्कश्शपणा मानवत नाही. मग तो माजलेल्या राजकारण्यांचा असो वा त्यांना विरोध करणाऱ्या स्वयंभू स्वच्छतावाद्यांचा असो. आपले सामूहिक समाजमन सुरुवातीस असे प्रकार सहन करते आणि नंतर अशा मंडळींना त्यांची जागा दाखवून देते. अण्णा आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या बाबतीत हा दुसरा टप्पा अपेक्षेप्रमाणे आला आहे, अशी त्यांची भाषा दर्शविते. मूठभर भ्रष्टाचाऱ्यामुंळे साऱ्या संसदेवर ठपका ठेवणाऱ्या अण्णा आणि त्यांच्या कंपूस हुकूमशाही हवी आहे काय? आणि ती समजा आली म्हणजे रामराज्य येते, असे त्यांना वाटते काय? या मंडळींची जगाची एकूण समज लक्षात घेता तसा त्यांचा समज नसेलच असे म्हणता येणार नाही. 
आपण काय बोलतो याचे भान या स्वयंभू स्वच्छता मोहीमवाल्यांना नाही. यंदा अधिक महिन्यामुळे शिमगा लवकर आहे. त्यामुळे शिमग्याची सोंगेही लवकरच येणार. केजरीवाल यांनी हे दाखवून दिले आहे.
http://www.loksatta.com/index.php?option=com_content&view=article&id=213051:2012-02-27-15-46-15&catid=29:2009-07-09-02-02-07&Itemid=7

पोलीस कुणाचे रक्षक

Sunday, February 26, 2012


राजधानी दिल्लीतले पोलीस सर्वसामान्य जनतेचे, गोरगरीब जनतेचे नव्हे तर ते गुंड-मवाल्यांच्या टोळ्यांचे, गुन्हेगारांचेच रक्षक असल्याच्या समजावर अलीकडच्याच घटनेने शिक्कामोर्तब झाले. राजधानीतल्या फ्रेंड्‌स कॉलनी विभागातल्या हॉटेल सूर्या या पंचतारांकित हॉटेलच्या बाहेरच्या रस्त्यावर पंधरा दिवसांपूर्वी भरदिवसा, बारा गुंडांच्या टोळीने एका युवकाला मोटारीतून खेचून बाहेर काढले. त्यांनी लाठ्या/काठ्या आणि लोखंडी गजांनी त्याला बेदम मारहाण केली. लाथाबुक्क्या घातल्या. गुंडांचा हा हैदोस पंचवीस मिनिटे सुरु होता. त्याला सोडवायसाठी-वाचवायसाठी गेलेल्या   चार लोकांनाही या गुंडांनी अमानुष मारहाण केली. परिसरातल्या मोटारींची तोडफोड करून ही गुंडांची टोळी राजरोसपणे पसारही झाली. विशेष म्हणजे ही मारहाण सुरु असताना अवघ्या हजार फुटांवर असलेल्या पोलीस ठाण्यात कळवूनही, पोलीस घटनास्थळी फिरकले नाहीत. मारहाण करणाऱ्यांना पकडण्याच्या ऐवजी पोलिसांची गस्त घालणारी मोटार शेजारून निघूनही गेली. जखमींना दवाखान्यात उपचारासाठी दाखल केल्यावरही पोलीस लवकर फिरकले नाहीत. या सशस्त्र टोळक्याने चोपून काढल्याने अर्धमेल्या झालेल्या भूपेंद्रने आपल्याला मारहाण करणाऱ्या गुंडांची नावेही पोलिसांना सांगितली होती. 13 फेब्रुवारीला भरदिवसा मारहाण करून दहशत निर्माण करणाऱ्या, युवकावर प्राणघातक हल्ला करणाऱ्या या टोळीचा दिल्ली पोलिसांनी 14 दिवस शोधही घेतला नाही. हॉटेल सूर्याच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात गुंडांनी केलेल्या मारहाणीची चित्रफितही अवघ्या दोन तासात पोलिसांना दिली होती. पण, पोलिसांनी काहीही केले नाही. वृत्तपत्रे आणि उपग्रह वृत्तवाहिन्यात पोलिसांच्या या गुंडांना पाठीशी घालायच्या, संरक्षण द्यायच्या कृत्याचा पंचनामा झाला तेव्हाच, अवघ्या बारा तासात या गुन्ह्यातल्या गुंडांना अटक झाली. तब्बल तेरा दिवस गुंडांची ही टोळी राजधानी दिल्लीत राजरोसपणे फिरत होती. घटना घडल्यावर संशयित गुन्हेगार पळून गेले, लपून बसले, त्यांना आम्ही शोधून काढले. अशी बढाई या विभागाचे अतिरिक्त पोलीस अधीक्षक अजय चौधरी यांनी मारली असली तरी, पोलीस कुणाचे रक्षक आहेत, हे दिल्लीकरांना माहिती असल्यामुळे, त्यांची प्रशंसा कुणीही करणार नाही. जखमी झालेला भूपेंद्र आणि त्याला बेदम मारहाण करणारा गुंडांच्या टोळीचा नायक रॉकी यांच्यात प्रेम प्रसंगावरून झालेल्या भांडणातूनच, मारहाणीची ही घटना घडल्याचे पोलिसांनी सांगितल्याने, या घटनेचे गांभीर्य काही कमी होत नाही. पोलिसांनीच गुंडांना मोकाट सोडले, ही बाब राजधानी दिल्लीच्या कायदा आणि सुव्यवस्थेवरच प्रश्नचिन्ह उभी करणारी ठरते. चित्रफीत मिळूनही पोलिसांनी काहीही कारवाई का केली नाही? भरदिवसा आणि तेही पोलीस ठाण्याच्या जवळच गुंडांच्या टोळ्या असा हैदोस घालत असतील, तर पोलिसांची जरब गुंड-मवाल्यांवर राहणार तरी कशी? राजधानी दिल्लीतल्या गुन्हेगारांना पोलिसांची कसलीही-काहीही भीती वाटत नसल्यानेच गुंडांना अडवणाऱ्या पोलिसांवरही दगडफेकीच्या घटना घडतात. पोलिसांनाही गुंड चोपून काढतात. पोलीस खात्याच्या अब्रूची लक्तरे वारंवार वेशीवर टांगली गेली, त्यांची छी-थू झाली, तरीही निर्ढावलेल्या-निगरगट्ट पोलीस खात्यावर त्याचा काहीही परिणाम झालेला नाही, हेच या घटनेने पुन्हा एकदा चव्हाट्यावर आले आहे.
राजधानी असुरक्षितच 
फ्रेंड्‌स कॉलनीतल्या या भयंकर घटनेला प्रसारमाध्यमांनी वाचा फोडली नसती तर, पोलिसांनी या गुंडांना अटक करून कारवाई केली असती, यावर दिल्लीकरांचा मुळीच विश्वास बसणार नाही. गेल्या पाच वर्षांत दिल्लीतल्या गुन्हेगांरावर जरब निर्माण करण्यात पोलीस खाते पूर्णपणे अपयशी ठरले. धावत्या मोटारीत युवतीवर बलात्कार, विद्यापीठांच्या परिसरातल्या बलात्काराच्या वाढत्या घटना, सामूहिक बलात्कार, गुंडांच्या टोळ्यांनी घरात घुसून मारहाण करायच्या वाढत्या घटना, भररस्त्यात महिलांची छेडछाड, चोऱ्या, दरोडे हे गुन्हे कमी झालेले नाहीत. अनेक गुन्ह्यांचा तपासही दिल्लीतल्या पोलिसांना लावता आलेला नाही. भरदिवसाही महिलांना सुरक्षितपणे फिरणे अवघड झाले आहे. मोटारसायकलवरून गुंडांच्या टोळ्या भरधाव वेगाने रस्त्यावरून जातात. वाटेत महिलांच्या गळ्यातले सोन्याचे दागिने हिसकावून पळून जातात. काही वेळा महिलांना धमकावून त्यांची लूट होते. उपनगरांच्या भागात दरोडे पडतात. झोपडपट्ट्यात काळ्या धंद्यांना आलेला ऊत, गुंडांची दहशत यामुळे गरीबांनाही जगणे अवघड झाले आहे. राजधानी दिल्लीत दररोज बलात्काराचा एक गुन्हा घडतो. दरवर्षी चोऱ्या, दरोडे, खून, हाणामाऱ्या असे पन्नास हजारांच्यावर गुन्हे घडतात. दिल्ली विधानसभेतही राजधानीतल्या वाढत्या गुन्हेगारीबद्दल कडाक्याची चर्चा झाली. विरोधकांनी मुख्यमंत्री शीला दीक्षित सरकारवर टीकेची झोड उठवली. पण, त्याचा काहीही उपयोग झाला नाही. केंद्रीय गृहमंत्र्यालयाचेही नियंत्रण असलेल्या या पोलीस खात्यावर सरकारची जरब राहिलेली नाही. भुरट्या चोऱ्या, हाणामाऱ्या दिवसाढवळ्या होतात. गुंडांना पोलिसांची भीती वाटत नाही. कायदा आणि सुव्यवस्थेच्या रक्षणाची जबाबदारी असलेले दिल्लीचे पोलीस गुंडांना मोकाट सोडतात आणि सामान्य जनतेचा छळ करत असल्याने, या खात्यावर सामान्य जनतेचा विश्वास राहिलेला नाही. गुंडांच्या टोळ्या आणि काही पोलिसांचे-अधिकाऱ्यांचे लागेबांधे असावेत, या संशयाला या घटनेने बळकटी येते. पोलीस ठाण्यात दाद मागायसाठी जाणाऱ्या सामान्य नागरिकांना अवमानास्पद वागणूक देणारे हे मग्रूर पोलीस गुंडांसमोर मात्र मुजरे ठोकतात, अशी दिल्लीकरांची सार्वत्रिक तक्रार आहे. संसदेच्या गजबजलेल्या कडक सुरक्षा व्यवस्था असलेल्या, कॅनॉट प्लेस, राजपथ परिसरातही दिवसाढवळ्या चोऱ्या होतात, याची शरम केंद्र सरकारलाही वाटत नाही. सामान्य जनतेला सुरक्षा देण्यात अपयशी ठरलेले हेच पोलीस खाते योगगुरु बाबा रामदेव यांच्या शिबिरावर मात्र मध्यरात्रीच्या अंधारात हल्ला चढवते. झोपलेल्या कार्यकर्त्यांना झोडपून काढते. त्यांच्या या विकृतीवर सर्वोच्च न्यायालयानेच अलिकडेच ताशेरे मारले. बाबा रामदेव यांचे भ्रष्टाचार विरोधी आंदोलन मोडून काढायसाठी क्रौर्याचा कळस गाठत, कार्यकर्त्यांवर केलेल्या अत्याचाराबद्दल सर्वोच्च न्यायालयाने दिल्ली पोलिसांवर कायद्याचे उल्लंघन केल्याचा ठपका ठेवला आहे. 4 जून 2011 ला अंधाऱ्या रात्री रामलीला मैदानावर नि:शस्त्र आणि झोपलेल्या कार्यकर्त्यांना बेदम मारहाण करणाऱ्या संबंधित पोलीस-अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करायचा सर्वोच्च न्यायालयाने दिलेला आदेश, म्हणजे खाकी वर्दीतल्या पिसाळलेल्या दिल्ली पोलीस आणि सरकारच्याही अब्रूचे धिंडवडे काढणारा आहे. केंद्र सरकारने या माजलेल्या पोलीस खात्यावर जरब बसवली नाही तर, दिल्लीच्या सुरक्षा व्यवस्थेचे आणखी तीन-तेरा वाजतील, हेच या घटनेने सिध्द झाले आहे.

मराठीचा संघर्ष कधी संपणार?


वर्षानुवर्षे सरकारी पातळीवरूनच मराठीची अवहेलना झाली आहे.
त्यामुळेच मराठीची आज सर्वच क्षेत्रांत दुरवस्था झाली आहे.

मराठीचा संघर्ष कधी संपणार?अलीकडील काळात हा ‘दिन’, तो ‘दिन’ साजरा करण्याची एक प्रथाच पडली आहे. काही दिन सरकारी पातळीवरूनही साजरे केले जातात. मराठी भाषा दिवस हा त्यापैकीच एक. २७ फेब्रुवारी हा कविश्रेष्ठ वि. वा. शिरवाडकर तथा कुसुमाग्रज यांचा जन्मदिवस. कुसुमाग्रजांनी मराठी भाषेला जो एक बहुमान मिळवून दिला, जो एक आयाम दिला त्यासाठी कुसुमाग्रजांचा जन्मदिन हा मराठी भाषा दिन म्हणून साजरा केला जातो. सरकारी, निमसरकारीच नव्हे तर सर्वच पातळ्यांवर त्यानिमित्ताने मराठीचा झेंडा फडकविला जातो. सत्ताधारी तर बोलूनचालून बोलघेवडेच असतात. इतर अनेक ‘दिन’ तसा त्यांच्यासाठी ‘मराठी भाषा दिन’. त्यानिमित्ताने एखादी घोषणा करायची एवढेच त्यांचे काम. पूर्वी केलेल्या घोषणांचे काय झाले याचा आढावा घेण्याचीही तसदी सत्ताधारी घेत नाहीत. ‘मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळवून देणार’ अशी घोषणा विद्यमान मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी काही महिन्यांपूर्वी विधानसभेत केली होती. त्यासाठी केंद्राकडे पाठपुरावा सुरू आहे असेही ते म्हणाले होते. काय झाले त्या पाठपुराव्याचे? घोषणा झाली की पाठ फिरवायची आणि पुरावा वगैरेपासून दुरावा घ्यायचा! मराठीला संपन्न करण्यासाठी राज्य शासनाने मराठी विभाग सुरू केला असून त्या विभागात ३५ नवीन पदे निर्माण करण्यात आली आहेत असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले होते. मुळात महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेनंतर पाच दशकांनी मराठी विभाग सुरू करण्याची वेळ राज्यकर्त्यांवर येते हीच लाजिरवाणी गोष्ट आहे. बरं, ती ३५ पदे तरी गेल्या सहा-सात महिन्यांत भरली गेली का? आजच्या मराठी भाषा दिनाच्या निमित्ताने मुख्यमंत्री सरकारीछाप उत्तर देतीलही, पण त्याने मराठी भाषा कशी संपन्न होणार? मुख्यमंत्र्यांप्रमाणेच उपमुख्यमंत्र्यांनीही ‘मराठीच्या संवर्धनासाठी वाटेल तेवढा पैसा देऊ’ असे मागील वर्षी विधान परिषदेत राणाभीमदेवी थाटात सांगितले होते. बोलायला काय जाते? आणि ‘मराठी भाषा सिंचन’ म्हणजे ‘जलसिंचन’ आहे काय, सरकारी पैसा वाटेल तेवढा ओतायला आणि त्यातला बराच मधल्यामध्ये जिरवायला! वर्षानुवर्षे
सरकारी पातळीवरूनच मराठीची अवहेलना झाली आणि त्यामुळेच मराठीची आज सर्वच क्षेत्रांत दुरवस्था झाली आहे. १९८७ मध्ये जागतिक मराठी परिषदेत बोलताना कविवर्य कुसुमाग्रजांनीच मराठीचे वर्णन ‘डोक्यावर राजमुकुट पण खाली वस्त्रांची लक्तरे असलेले मराठी’ असे केले होते. त्याच कुसुमाग्रजांचा जन्मदिवस आज मराठी भाषा दिन म्हणून साजरा होतो. मात्र मराठीच्या ‘लक्तरावस्थेत’ एवढ्या वर्षांत काही प्रमाणात तरी सुधारणा झाली आहे का? राज्य सरकारचा कारभार तरी मराठीतून किती होतो हा प्रश्‍न आजही आहेच. मंत्रालयातील इंग्रजी ‘पाट्या’ बदलून त्या मराठी भाषेत करण्यासाठी शेवटी शिवसेनेलाच आंदोलन करावे लागले यातच सगळे आले. राज्यकारभार मराठीतून सुलभपणे व्हावा यासाठी इंग्रजी शब्दांना समानार्थी मराठी शब्द असलेले जे शब्दकोश तयार केले गेले त्यात एक पदनाम कोशदेखील होता. मात्र त्याची ‘बदनाम कोश’ अशी हेटाळणी करणारी मंडळी शासन-प्रशासनातच होती. मराठी शाळांच्या दुरवस्थेबद्दल काय बोलावे! सरकार काय किंवा मराठी भाषिक काय, सर्वच मराठी शाळांच्या दुरवस्थेला जबाबदार आहेत. ‘माय मरो मावशी जगो’ अशी मराठीत म्हण आहे. मात्र मराठी माय मेली तरी चालेल पण इंग्रजी ही सावत्र मावशी जगली पाहिजे असाच अर्थ मराठी जनांनी लावला आहे. महाराष्ट्रातच मराठी शाळा राजाश्रय आणि लोकाश्रय गमावून बसल्या आहेत. २००५ पासून सरकारने एकाही मराठी शाळेला परवानगी दिलेली नाही. अन्य भाषिक शाळा आणि इंग्रजी शाळांचे पीक मात्र दरवर्षी न चुकता बहरत असते. मराठी शाळा महाराष्ट्रात नाही तर काय आंध्र प्रदेश, कर्नाटकात सुरू करायच्या? इंग्रजीची अपरिहार्यता मान्य केली तरी
मायमराठीच्या उरावर इंग्रजी कायमची बसवायची असा त्याचा अर्थ होत नाही. तुमचे ते ग्लोबलायझेशन वगैरे इतर क्षेत्रांत ठीक आहे, मराठी भाषा प्रांतात कशासाठी आणता? सरकार आणि मराठी भाषिक या दोघांनीही आता तरी या गोष्टीचा विचार करायला हवा. सरकार एरवी ‘व्हिजन डॉक्युमेंट’ वगैरे सादर करते. मराठी भाषेबाबत पुढील वीस-पंचवीस वर्षे ध्यानात घेऊन एखादे दीर्घ धोरण सरकार आता तरी आखणार आहे का? मराठी भाषा आणि संयुक्त महाराष्ट्रासाठी १०५ हुतात्म्यांनी रक्त सांडले. महाराष्ट्राचे दुर्दैव असे की, मराठी भाषेचे शत्रू स्वकीयच आहेत. कुठलीच भाषा कायमची संपत नाही किंवा कायमची वरचढ होत नाही हे खरे, पण मराठी भाषेचा लढा हा दुर्दैवाने न संपणारा लढा ठरला आहे. शिवसेनेच्या माध्यमातून आम्ही हा लढा ‘की घेतले हे व्रत न अंधपणाने’ या एका ठाम विचाराने सुरूच ठेवला आहे. पाच दशकांपूर्वी मराठीच्या विचारांची आणि त्यासाठीच्या लढ्याची ठिणगी शिवसेनेनेच टाकली होती. मराठीच्या या धगधगत्या यज्ञकुंडात समिधा टाकण्याचे कार्य थांबलेले नाही आणि थांबणारही नाही. बाकी मराठी भाषा दिवसाच्या निमित्ताने कॉंग्रेससारख्या सत्ताधार्‍यांनाही मराठीचा गजर करावा लागतो, मराठी माणूस, मराठी भाषा यांचे भवितव्य याविषयी तोंडदेखली काळजी व्यक्त करावी लागते हेदेखील कमी नाहीच. आता त्यामुळे कानडी वरवंट्याखाली वर्षानुवर्षे भरडल्या जाणार्‍या मराठी बांधवांची महाराष्ट्रात परतण्याची आस पूर्ण होणार आहे का? महाराष्ट्राच्या मंत्रालयात, सचिवालयात फक्त आणि फक्त मराठीतूनच शंभर टक्के राज्यकारभार होणार आहे का? न्यायालयीन कामकाज मराठीतून होईल का? मराठीला पडलेला अन्य भाषांचा विळखा सैल होईल का? नाव महाराष्ट्राचे, राज्य अमहाराष्ट्रीयांचे हे चित्र बदलेल का? मराठी शाळांना सरकारी परवानगी मिळणे सुरू होईल का? मराठी शाळा पुन्हा बहरतील का? मराठीचा संघर्ष कधी संपणार...? प्रश्‍न असंख्य आहेत. किंबहुना ते मराठीविषयी असल्याने मारुतीच्या शेपटाप्रमाणे न संपणारे आहेत. मराठी भाषा दिवस साजरा करायला काहीच हरकत नाही, पण त्यामुळे यापैकी किती प्रश्‍नांची उत्तरे मिळतील, किती प्रश्‍न सुटतील हाही एक प्रश्‍नच आहे.

क्रिकेटचे गारदी


क्रिकेटमधील गारदय़ांनी सध्या अचानक उचल खाल्ली आहे. त्यांना ताबडतोब बळी हवा आहे आणि तोही कुण्या सोम्यागोम्याचा नाही तर चक्क किक्रेटचा देव मानल्या जाणार्‍या सचिन तेंडुलकरचा. सध्या भारतीय क्रिकेट काहिसे झाकोळले आहे. सतत होणारे पराभव, मान्यवर खेळाडुंचे अपयश याची जबाबदारी कर्णधाराचीच असते. त्यामुळे कर्णधार धोणी याला बदलण्याची मागणी सुरू होणे साहजिक आहे. पण तेवढेच नाही, तर फूटवर्कला सोडचिठ्ठी देणार्‍या आणि फिटनेसची पर्वा न करणार्‍या वाढत्या पोटाच्या खेळाडूंना बॅट फिरवणेही अवघड झाल्याने भारतीय क्रिकेट संघ सतत पराभवाच्या छायेत असतो. त्यांच्यामुळे क्रिकेटला असलेले ग्लॅमर संपुष्टात येत आहे. ती संधी साधूनच सहाराने क्रिकेट संघाचा ह्यसहारा काढून घेतला होता. आता तो महत्प्रयासाने पुन्हा मिळविला असला तरी क्रिकेटवरचे सावट संपलेले नाही. सततच्या पराभवामुळे बर्‍याच प्रस्थापित खेळाडूंना वगळण्याची मागणी होत आहे. त्या मागणीचा रोख क्रिकेटचे महर्षी म्हणविणार्‍यांनी सचिनकडे वळवला आहे. एक दिवसीय क्रिकेटमध्ये म्हणे सचिन आता खेळू शकत नाही. त्याचा खेळ धीमा झाला आहे. कसोटीमध्ये शतकांचे शतक पूर्ण करणे त्याला अवघड जात आहे, वगैरे.वगैरे.. ही गोष्ट खरी आहे की, सध्याच्या क्रिकेटपटूंमध्ये सचिन अनुभव व वयानेही ज्येष्ठ आहे. वाढत्या वयाचा परिणाम त्याच्या खेळावर झाला आहे हेही कुणी नाकारत नाही. पण त्याला नवृत्त होण्याचा अनाहूत सल्ला कुणी देण्याची गरज नाही. आपण केव्हा नवृत्त व्हायचे हे त्या खेळाडूलाच ठरवू दिलेले बरे. विशेषत: आजच्या दिखावू क्रिकेटच्या जमान्यात केवळ प्रेक्षकांच्या टाळय़ा, शिट्ट्या मिळवण्यासाठी वेडीवाकडी बॅट फिरवणार्‍या खेळाडुंमध्ये कॉपीबुक पध्दतीने खेळणारे जे थोडे क्रिकेटपटू उरले आहेत त्यामध्ये सचिनचे नाव सर्वात वरचे आहे. केवळ त्याची फलंदाजी पाहण्यासाठी स्टेडियममध्ये जाणारे आणि टीव्ही ऑन करणारे आजही अनेक क्रिकेटवेडे आहेत. अशा अवस्थेत त्याला सक्तीने रिटायर्ड केले तर क्रिकेटमध्ये पाहण्यासारखे काय उरेल? मध्यंतरी राहुल द्रविडने भारतीय क्रिकेटच्या अवनतीला वैतागून अचानक नवृत्ती जाहीर केली, पण क्रिकेट शौकिनांना ती अजिबात मंजूर नव्हती. शेवटी त्याला ती मागे घ्यावी लागली. सचिनच्या बाबतीतही यापेक्षा वेगळे घडण्याची शक्यता नाही. क्रिकेट शौकिनांच्या सचिनकडून काही अपेक्षा आहेत, त्या पूर्ण झाल्याशिवाय क्रिकेट रसिक त्याला हा खेळ मग एक दिवसीय असो की कसोटी, सोडू देणार नाहीत. अनेकदा स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर यांना विचारण्यात येते की, तुम्ही नवृत्त कधी होणार, तेव्हा त्या म्हणतात की, संगीत हेच माझे जीवन आहे. माझ्याकडे संगीताशिवाय आहेच काय, त्यामुळे मी मरेन तेव्हाच त्यातून नवृत होईन. हेच उत्तर सचिनलाही लागू आहे. अर्थात सचिन तहहयात खेळत राहील असे नाही, पण ह्यटाइम प्लीज कधी करायचा हे त्याला नीट माहित आहे. त्यालाच तो करू देणे योग्य आहे. त्यासाठी गारदय़ांनी उतावीळ व्हायचे कारण नाही आणि कुणी ह्यध चा ह्यमा करायची गरज नाही.

एका "क्रांति'पर्वाची शताब्दी


प्रत्येकाच्या पाठीवर हात ठेवून कुसुमाग्रज लढायला सांगायचे. म्हणूनच रोजीरोटीच्या लढाईत श्‍वास कोंडलेली खूप माणसे कुसुमाग्रजांकडे येत व जगण्याची ऊर्मी घेऊन जात असत. 

कशास आई, भिजविसि डोळे, उजळ तुझे भाल 
रात्रीच्या गर्भात उद्याचा असे उषःकाल 
मृत्यूच्या दारात पाऊल टाकतानाही जे देशभक्त अढळ असतात त्यांच्या "क्रांतीचा जयजयकार' पेरणारे ज्ञानपीठ पुरस्कारविजेते वि. वा. शिरवाडकर तथा कविश्रेष्ठ कुसुमाग्रज यांच्या जन्मशताब्दी वर्षाचा आज समारोप होत आहे. "युगामागुनी चालली युगे ही, किती करावी भास्करा वंचना,' असे पृथ्वीचे प्रेमगीत गाणाऱ्या कुसुमाग्रजांनी माणसांच्या मनामनांमध्ये प्रीतीची ज्योत जागविली आहे. त्यामुळे त्यांची कविता, त्यांचे साहित्य शताब्दीच्या कालमर्यादांच्या पलीकडचे आहे. नित्यनूतन आहे. आज शताब्दीच्या समारोपातही तात्यासाहेबांची कविता माणुसकीच्या वाटेवर मानव्याची पूजा करण्यासाठी सचेतन, प्रवाही होत निघाली आहे. मुळात तात्यासाहेब केवळ शब्दांना प्रसवणारे, शब्दांमध्ये अडकणारे नव्हते, तर साहित्य व माणसाचे जीवन हातात हात घालून कसे पुढे जाऊ शकते, याचा आदर्श वस्तुपाठ त्यांनी आपल्या साहित्यसंपदेतून व सर्वांत महत्त्वाचे म्हणजे आपल्या वागण्या, वावरण्यातून घालून दिला. मराठी साहित्याच्या विश्‍वामध्ये कुसुमाग्रज आपल्या तेजस्वी प्रतिभेने तळपत राहिले. "गर्जा जयजयकार, क्रांतीचा गर्जा जयजयकार' हे क्रांतिसूक्त त्यांनी मुक्तकंठाने गायले. शब्दांमध्ये कधी अंगार ओतत त्यांनी मराठी सारस्वताचे डोळे दिपविले, तर कधी नावाप्रमाणेच अतिशय कुसुम व कोमल शैलीने आपली मुद्रा उमटविली. नाटक, कविता, कथा, कादंबरी असे वाङ्‌मयाचे विविध प्रांत त्यांनी समर्थपणे पादाक्रांत केले. अनेक राज्य पुरस्कार, साहित्य अकादमी पुरस्कार, साहित्य संमेलनाचे सन्माननीय अध्यक्षपद या सर्वांवरचा कळस म्हणजे 1988 मध्ये त्यांना मिळालेला ज्ञानपीठ पुरस्कार. अशी ज्यांच्या कर्तृत्वाची गाथा होती ते कुसुमाग्रज, काळाच्या पडद्याआड गेले असले तरी शतकानंतरही मराठी माणसांच्या मनात अढळस्थानी आहेत. ज्यांना त्यांचा सहवास मिळाला, त्या सर्वांसाठी तर त्यांच्या नुसत्या आठवणीदेखील आनंदपर्वणी आहे. 

उभारीच्या काळात आपल्या शब्दकाव्यातून क्रांतीचा जयजयकार केला, तेच कुसुमाग्रज अनेकदा बदलत्या सामाजिक संदर्भात पुढे अस्वस्थही होत गेले. भारतीय स्वातंत्र्याला पन्नास वर्षे झाल्याच्या निमित्ताने त्यांनी लिहिलेली "स्वातंत्र्यदेवीची विनवणी' असा काही फटका आहे, की त्यातून संवेदनशील मनाला खडबडून जागेच व्हावे लागेल. मायमराठी मरत असताना परकीचे पद चेपणाऱ्यांवर कुसुमाग्रजांनी कोरडे ओढले. जातींचे जहर हटविण्यासाठी हा कवी समाजाला पुकारत राहिला. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे या कवीचे समाजासाठी अखंड राबणाऱ्या कार्यकर्त्यांत लढाऊ रूपांतर होऊन गेले. त्यामुळेच कुसुमाग्रज हे नाशिककरांचे ग्रामदैवत व तमाम मराठी माणसांचे स्फूर्तिस्थान बनून गेले. कुसुमाग्रज यांचे घर म्हणजे त्यांना भेटण्यासाठी येणाऱ्या प्रत्येक माणसाला मंदिराच्या गाभाऱ्यापलीकडचेही आनंदनिधान होता. ओळखीचा असो वा नसो, प्रत्येकासाठी ते आत्मीयतेचे अत्युच्च शिखर होते. स्वतःचा वाढदिवस स्वतः कधीच साजरा न करणारे कुसुमाग्रज, आदिवासींच्या पाड्यावर जाऊन त्यांची दुःखे पाहत. ती दूर करण्याचे प्रयत्न करत. दुःखाची सामिलकी करत. सहभागी हा शब्द त्यांना कधी आवडायचा नाही. ज्ञानपीठ पुरस्काराच्या निमित्ताने मिळालेल्या रकमेचेच प्रतिष्ठान करणारे कुसुमाग्रज पुढे समाजाचे शिल्पकार बनून गेले. गोदातीरावर थंडीत कुडकुडणाऱ्या भिकाऱ्यांच्या अंगावर भर थंडीत स्वतः मध्यरात्री जाऊन गोधड्या पांघरणारे कुसुमाग्रज "आहे रे व नाही रे'मधील दरी कमी करण्याचे काम करत होते. वाचन संस्कृती वाढावी म्हणून फिरत्या वाचनालयांचा आग्रह धरत होते. त्यांचे साहित्य व त्यांचे व्यक्तिगत जीवन हातात हात घालून मराठी माणसांच्या विकासाचे स्वप्न पाहत होते. कुसुमाग्रजांच्या जन्मशताब्दीचे सोहळे करताना समाज व शासनावर मोठी जबाबदारी आहे. ज्या निगर्वीपणाने, साधेपणातून कुसुमाग्रजांनी आपल्या कृतीमधून सामान्य माणसांना जिंकून घेतले होते, तोच सामान्य माणूस मध्यवर्ती ठेवून कुसुमाग्रजांच्या आठवणी जाग्या ठेवाव्या लागतील. एखाद्या बगीच्याला, फुलपाखरू उद्यानाला कुसुमाग्रजांचे नाव देण्याचे सोहळे उरकले जात असतील व पुढे ते बगीचे उद्‌ध्वस्त होऊन जाणार असतील तर काय उपयोग? स्थानिक खासदारांच्या पाठपुराव्यामुळे जन्मशताब्दीचे औचित्य साधून नाशिक, मुंबई रेल्वेला कुसुमाग्रज एक्‍स्प्रेस नाव देण्याची घोषणा झाली. मात्र, जन्मशताब्दीचे वर्ष संपले तरी कुसुमाग्रज एक्‍स्प्रेस अजून काही धावली नाही. अशा अस्वस्थतेच्या वळणावर ती कधी धावणार, हा प्रश्‍न आहे. ज्या महाकवीने माणुसकी वाढविण्याचे कार्य केले, त्यांची आठवण जपण्यासाठी समाजजीवनात वाढत असलेल्या काळोखात तेजाची लेणी खोदण्यासाठी साहित्य, समाज आणि माणूस यांच्यातील धागा गच्च करावा लागेल. 

सक्षम मराठीच्या दिशेने...


जागतिकीकरण, खाजगीकरण आणि उदारीकरण यांच्या झंझावातातही मराठी भाषेची ध्वजा दिमाखात फडकत ठेवली पाहिजे याची जाणीव करून देणारा आजचा 'मराठी भाषा दिन' हा प्रत्येक मराठी भाषकासाठी महत्त्वाचा आहे. प्रतिभावंत साहित्यिक वि. वा. शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रज यांचा २७ फेब्रुवारी हा जन्मदिवस. त्यांच्या प्रतिभेला सलाम करतानाच त्यांनी आपल्या मायबोलीच्या दुरवस्थेबाबत व्यक्त केलेली चिंता आजही काळजीचाच विषय आहे. मुंबईसारख्या महानगरातील मराठी शाळांची रोडावणारी संख्या आणि पदवी परीक्षेसाठी मराठी भाषा घेणाऱ्यांमध्ये होणारी घट ही चिंतेचीच बाब आहे. मुंबईलगतच्या परिसरातही आता हळूहळू इंग्लिश माध्यमाच्या शाळांमध्ये जाणाऱ्यांची संख्या वाढते आहे. साहजिकच तिथेही मराठी शाळांना ओहोटी लागली आहे. जागतिकीकरणाच्या वावटळीमध्ये आता 'करियर'साठी देशांच्या सीमांना फारसा अर्थ उरलेला नाही. शिवाय पाश्चात्त्य तेच सर्वच चांगले, असा समज असणाऱ्या वर्गाची संख्याही आता वाढते आहे. याला मुख्यत: नवश्रीमंत आणि विस्तारणारा मध्यमवर्ग जबाबदार आहे. त्यांचेच अनुकरण समाजातील इतर घटकही करतात. या साऱ्याचा एकत्रित परिणाम मराठी माध्यमाच्या शाळांकडे पाठ फिरवण्यामध्ये झाला आहे. 

वास्तविक प्राथमिक शिक्षण मातृभाषेतून होणेच चांगले असते, असे तज्ज्ञांनी अनेकवार सांगितले आहे. परंतु ते कानाआड केले जात आहे. या प्रश्नाचा आजच्या दिनी गांभीर्याने विचार होणे आवश्यक आहे. आजच्या विलक्षण स्पधेर्च्या युगामध्ये आपल्या मायबोलीवर नुसते भाबडे प्रेम करून चालणारे नाही, तर ती अधिकाधिक सशक्त कशी होईल याचा विचार करणे गरजेचे आहे. मराठी ही ज्ञानभाषा झाली, तरच ती इंग्लिशशी टक्कर घेऊ शकेल. आज इंग्लिश ही जागतिक भाषा म्हणून मानली जाते; कारण ती ज्ञानभाषा आहे. दुसरे असे की त्या भाषेने स्वत:भोवती कोणतेही कुंपण घालून घेतले नाही. उलट अनेक भाषांतील नवनव्या शब्दांना इंग्लिशने आपलेसे केले आहे. कोणतीही भाषा ही प्रवाही असते, तेव्हाच ती अधिकाधिक सक्षम होण्याच्या दिशेने वाटचाल करत असते. आपण मात्र भाषेबाबत फारच कडवी भूमिका घेत आलो आहोत. 

आज विज्ञानाच्या विविध शाखांमध्ये होत असलेली प्रगती आपल्या घराचा उंबरठा ओलांडून येत आहे. या प्रगतीची दखल घेताना मराठी शब्दच वापरले पाहिजेत, असा हट्ट धरून चालणार नाही. जिथे चपखल आणि सहज आकलन होणारे पर्यायी शब्द आहेत, तिथे ते वापरण्यास हरकत नाही. मात्र प्रत्येकवेळी मराठीचा आग्रह धरणे योग्य नाही. उदाहरणच द्यावयाचे तर ट्युमर या शब्दाऐवजी अर्बुद असा शब्द वापरला तर त्याचा अर्थ कितीजणांना समजेल? मात्र याचा अर्थ मराठीतील पर्यायी शब्द वापरूच नयेत असे नाही. मात्र त्यासाठी मराठी हीसुद्धा ज्ञानभाषा व्हायला हवी. तशी ती झाली की विविध क्षेत्रांत होणाऱ्या प्रगतीचे स्पष्ट चित्र रेखाटण्यासाठी आवश्यक असणारी भाषा आपोआपच घडत जाईल. प्रतिभावंताच्या लेखणीमधूनच त्याची अशी शैली साकारत जाते, तशीच प्रगतीला लीलया आपल्या कवेत घेणारी मराठीही अधिकाधिक सक्षम होत जाईल. खरेतर मराठी भाषा किती श्रीमंत आहे, हे संतवाङ्मयातून फार समर्थपणे दिसते. 

गीतेतील तत्त्वज्ञानावर भाष्य करणाऱ्या ज्ञानेश्वरांनी तर 'जैसें बिंब तरी बचकें एवढें। परि प्रकाशा त्रैलोक्य थोकडें। शब्दाची व्याप्ती तेणें पाडें। अनुभवावी' असे सांगितले आणि ते सिद्धही केले. तुकारामांनी 'आम्हा घरी धन शब्दाचींच रत्नें। शब्दाचींच शस्त्रें यत्ने करूं।। शब्द चि आमुच्या जीवाचें जीवन। शब्दें वांटंू धन जनलोका।।' असे सांगितले आणि या शब्दभांडारांतूनच त्यांनी गुह्य ज्ञान समाजातील सर्व थरांसाठी मोकळे केले. आताच्या काळात असे काम समाजातील सर्वच क्षेत्रांतील जाणत्यांना करावयाचे आहे. तसे ते करण्याचा संकल्प आजच्या दिनी केला आणि तो अमलातही आणला तर मराठी भाषा अधिक समृद्ध होण्याच्या दिशेने वाटचाल करू लागेल. मराठी साहित्याच्या प्रांतात आता अनेक विषय नव्याने प्रवेश करते झाले आहेत आणि त्यांना वाचकांचा उत्तम प्रतिसाद मिळतो आहे, ही सुखावह गोष्ट आहे. मराठी ग्रंथप्रदर्शनांना मिळणारा प्रतिसाद हा फारच उत्साहवर्धक असतो. त्यातून लोकांच्या आवडींमध्ये पडलेला फरकही स्पष्ट दिसतो. ललित साहित्यापेक्षासुद्धा जास्त मागणी ही माहितीपर, नवीन विषयांची ओळख करून देणाऱ्या, अज्ञात जगाची खिडकी उघडून दाखविणाऱ्या ग्रंथांना असते. एका अर्थाने या बदलत्या अभिरूचीतून आजच्या पिढीच्या आकांक्षाच प्रतिबिंबित होत आहेत. त्याची दखल प्रसारमाध्यमांसकट सर्वच संबंधितांनी घेणे आवश्यक आहे. तशी ती घेण्याचा निश्चय आज केला तर मराठी श्रीमंत होण्याकडे वाटचाल करू लागेल. 
Related Posts Plugin for WordPress, Blogger...

लोकमत

सामना

ऐक्य

 

© Copyright संपादकीय अग्रलेख 2010 -2011 | Design by Herdiansyah Hamzah | Published by Borneo Templates | Powered by Blogger.com.